

‘धुरंधर’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करत असून त्याच्या कमाईचे आकडे सर्वांना चकित करत आहेत. ट्रेड चर्चांनुसार या चित्रपटाने ‘जवान’सारख्या मोठ्या सिनेमालाही टक्कर दिली आहे. त्यामुळे आता ‘पुष्पा २’सारख्या बहुप्रतीक्षित चित्रपटावरही ‘धुरंधर’चा प्रभाव पडणार का, याकडे सिनेप्रेमींचे लक्ष लागले आहे.
Dhurandhar Box Office Collection Day 29
बॉक्स ऑफिसवर सध्या एकाच चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे आणि तो म्हणजे ‘धुरंधर’. प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अपेक्षांपेक्षा अधिक गती पकडलीय. विशेष म्हणजे, शाहरुख खानच्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘जवान’शी ‘धुरंधर’च्या कमाईची तुलना केली जात आहे. काही बॉक्स ऑफिस विश्लेषकांच्या मते, ओपनिंग वीकेंड आणि पहिल्या आठवड्यातील आकडे पाहता ‘धुरंधर’ने ‘जवान’ला काही ठिकाणी मागे टाकल्याची चर्चा आहे.
२९ दिवसांनंतरही, रणवीर सिंगचा "धुरंधर" चित्रपट रेकॉर्डतोड कमाई करत आहे. इतर सर्व चित्रपटांनाही त्याने मागे टाकले आहे. आता, त्याने शाहरुख खानच्या "जवान"लाही मागे टाकले आहे. पण, रणवीरचा "धुरंधर" अल्लू अर्जुनच्या "पुष्पा २" ला मागे टाकेल का? याकडे फॅन्सचे लक्ष लागून राहिले आहे.
आदित्य धरचा "धुरंधर" ५ डिसेंबर २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. तेव्हापासून फक्त चर्चा सुरु आहे ती धुरंधरचीच. २९ दिवसांत रणवीर सिंहच्या चित्रपटाने १००० कोटी रुपयांचा आकडा ओलांडला आहे. २९ व्या दिवशीही कमाई गती कायम राहिली आहे.
धुरंधर कलेक्शन
"धुरंधर"ने भारतात ७८४.५० कोटी रुपयांची कमाई केली, तर जगभरात त्याचा एकूण आकडा १२०० कोटी रुपयांच्या जवळ पोहोचला आहे. धुरंधरने शाहरुख खानच्या जवान चित्रपटालादेखील मागे टाकले आहे. आता अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २' ला मागे टाकेल का, याकडे फॅन्सचे लक्ष लागून राहिले आहे.
अहवालानुसार, रणवीर सिंहच्या 'धुरंधर'ने २९ व्या दिवशी ८.७५ कोटी रुपये कमावले आहेत. भारतात ७४७.७५ कोटी रुपये असा एकूण कमाई अंदाजे ८९७.२५ कोटी रुपये झाला आहे. वर्ल्डवाईड ११६२.२५ कोटी रुपये झाला आहे. हा ब्लॉकबस्टर 'जवान'ने १,१४८.३२ कोटी रुपये होता. तर ५०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेला 'पुष्पा २' ला मागे टाकण्यासाठी 'धुरंधर' ला आणखी कमाई करावी लागणार आहे.