पुढारी ऑनलाईन
अभिनेत्री कृती सेननची लहान बहिण आणि अभिनेत्री नुपूर सेनन आता बॉलीवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. नवाझुद्दिन सिद्दीकीसोबत तिला डेब्युची संधी मिळाली आहे. या चित्रपटाचे नाव नुरानी चेहरा असे आहे. काला शाह काला या पंजाबी चित्रपटाचा हा अधिकृत रीमेक आहे. नवनियत सिंह चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. हा एक सामाजिक संदेश देणारा कॉमेडी चित्रपट आहे.
लोकांच्या बाह्य रूपावरून येणार्या अनुभवांवर हा चित्रपट आधारित आहे. नुपूर म्हणाली की, नूर आणि हिबा यांची ही प्रेमकहानी आहे. माझ्यासाठी हा मोठा ब्रेक आहे. दरम्यान, यापुर्वी नुपूर अक्षयकुमारसोबत एका म्युझिक व्हिडिओत दिसली होती.