Kriti Sanon's controversial Raksha Bandhan ad |भावना दुखावल्याचे मान्य करत कृती सेनॉनची वादग्रस्त रक्षाबंधन जाहिरात ब्रँडने घेतली मागे

ज्वेलरीच्या एका ब्रँडने कृती सेनॉनच्या कपड्यांवरून झालेल्या वादानंतर जाहिरात मागे घेतली आहे.
Kriti Sanon Rakhi Ad Controversy
Kriti Sanon Rakhi Ad ControversyPudhari
Published on
Updated on

Raksha Bandhan advertisement controversy

प्रचंड टीका झाल्यानंतर रक्षाबंधनची वादग्रस्त जाहिरातीमु‍ळे भावना दुखावल्याचे ज्वेलरी ब्रँडन मान्य केले आहे. रक्षाबंधनच्या जाहिरातीत अभिनेत्री कृती सेनॉन हिच्या कपड्यांवरून तीव्र रोष निर्माण झाला होता. रक्षाबंधन सणानिमित्त भेटवस्तू देण्याबाबतच्या या जाहिरातीतील कृतीच्या पोषाखावरू अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच हे आपल्या संस्कृतीत बसत नसल्याचे म्हटले होते. पण, दुसरीकडे मात्र, अभिनेत्री कृतीने आपल्या कपड्यांच्या निवडीचे समर्थन केले आणि संस्कृती आपल्या मनात असली पाहिजे, असे म्हटले.

ब्रँडकडून कृती सेनॉनची जाहिरात मागे

त्या ब्रँडने बुधवारी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या निवेदनात ब्रँडने म्हटले: "भारतीय संस्कृती, परंपरा आणि सणांबद्दल आम्हाला अत्यंत आदर आहे. एक ब्रँड म्हणून, आम्ही नेहमीच संपूर्ण कुटुंबासोबत आनंदाचे क्षण साजरे करण्यावर विश्वास ठेवला आहे आणि ..आमच्या अलीकडील जाहिरातीमुळे समाजातील काही घटकांच्या भावना अनावधानाने दुखावल्या गेल्या असतील, तर तसा हेतू अजिबात नव्हता." "आदरखातर, आम्ही ती जाहिरात सर्व माध्यमांतून मागे घेतली आहे. या सणासुदीच्या काळात तुम्हाला खूप प्रेम आणि सकारात्मकता मिळो!" ब्रँडने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर केलेल्या पोस्टमधील कमेंट्स बंद केल्या.

नेमकी टीका कशावर?

संबंधित जाहिरात २० जुलै रोजी प्रदर्शित झाली होती. तेव्हापासूनच कमेंट्स विभागात लोकांकडून आक्षेप नोंदवले जात होते. एका कमेंटमध्ये म्हटले गेले, "बिकिनी घालून भावाला राखी कोण बांधते?" अनेकांनी याला हिंदू परंपरांची थट्टा असल्याचे म्हटले. एकाने लिहिले, "कपड्यांची निवड ठीक आहे, पण हिंदू सणादरम्यान नाही. मी या जाहिरातीशी पूर्णपणे असहमत आहे."

अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत यांनीही इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले, "स्त्री असण्यासाठी हा एक अद्भुत काळ आहे. आमची कपाटे विविध प्रकारच्या कपड्यांनी भरलेली आहेत, आजची स्त्री ही जागतिक स्तरावरील स्त्री आहे. कॉकटेल ड्रेसेसपासून लेहेंगा-चोलीपर्यंत, जीन्सपासून साड्यांपर्यंत, बिकिनीपासून सलवार-कमीजपर्यंत, आज आपल्याकडे उपलब्ध असलेल्या अनेक पर्यायांपैकी, तुम्ही बिकिनी किंवा अंतर्वस्त्रांमध्ये भावाला राखी का बांधाल? तुमचे इतर स्टायलिंग पर्याय कुठे गेले?''

काय म्हणाली कृती सेनॉन?

टीकेनंतर मात्र कृती सनॉनने ट्रोलर्सना सुनावले. ती म्हणाली, सण म्हणजे केवळ कपडे नव्हेत. मंगळवारी आपल्या "सणांचे खरे महत्त्व त्या परंपरेबद्दल तुमच्या मनात असलेल्या भावना आणि अर्थांमध्ये असते. रक्षाबंधन हे संरक्षणाचे नाते आहे. मी आणि माझी बहीण एकमेकींना राखी बांधतो. आम्हाला माहित आहे, की एखादा भाऊ जसे रक्षण करतो, तसेच आम्हीही एकमेकींचे रक्षण करू शकतो. आम्ही एकमेकींच्या आरोग्यासाठी, आनंदासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो. आणि आमच्यासाठी, ही प्रार्थना आणि वचन आमच्या कुत्र्यांसाठीही लागू होते! शेवटी, तेही आमच्या कुटुंबाचाच एक भाग आहेत!

Kriti Sanon Rakhi Ad Controversy
Gandhari script Controversy|'गांधारी'चा वाद; कथेची संकल्पना चोरल्याचा दावा Netflix च्या रुचिका कपूरने फेटाळला, नेमकं प्रकरण काय?

तसेच, स्त्रियांनी काय कपडे घालावेत हे सांगणे आपण कधी थांबवणार आहोत?? काळाच्या ओघात 'एथनिक फॅशन'मध्ये (पारंपरिक वेशभूषेत) बदल झाले आहेत, तरीही एखाद्या स्त्रीचा तिच्या संस्कृतीप्रती असलेला आदर केवळ तिच्या कपड्यांवरून मोजला जातो!! संस्कृती आणि परंपरा तिच्या हृदयात असतात, तिच्या कपड्यांच्या नेकलाईनमध्ये नाही!"

Kriti Sanon Rakhi Ad Controversy
Gunmaaster G9 Teaser | ‘गनमास्टर जी9’चं विश्व सुरु होतंय; इमरान हाशमी पुन्हा लव्हर बॉयच्या अंदाजात (व्हिडिओ)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news