

पुढारी ऑनलाईन डेस्क - लॉस एंजिल्समध्ये कश्मीरा शाहचा मोठा अपघात झाला आहे. तिने रक्ताने माखलेले कपड्यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केली आहे. इन्स्टाग्रामवर हा फोटो पाहिल्यानंतर तिच्या फॅन्सना चिंता वाटत आहे. कॉमंट बॉकिसमध्ये तिची विचारपूस करताना नेटकरी दिसत आहेत. तर कृष्णा अभिषेकने कॉमेंट सेक्शनमध्ये चिंता जाहिर केली आहे. इंडस्ट्रीच्या तमाम लोकांनी तिची तब्येतीची चौकशी केली आहे.
कश्मीरा सध्या लॉस एंजेलिसमध्ये आहे. तिची दोन्ही मुले रेयान आणि कृषांग हे वडील कृष्णा अभिषेकसोबत ७ नोव्हेंबरला तिथे आले होते. त्यानंतर त्यांनी खूप साऱ्या रील्स देखील शेअर केली होती. कॉमेडियन-अभिनेता आपल्या मुलांसोबत दंगा मस्ती मज्जा करताना दिसले होते.
कश्मीरा शाहने रक्ताने माखलेले कपडे शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं, 'मला वाचवण्यासाठी परमेश्वर तुझे आभार. खूप भयानक घटना होती. काही तरी मोठं होणार होतं. पण अपेक्षा आहे की, जखमांचे व्रण राहणार नाहीत. प्रत्येक क्षण जगा. परत येण्याची प्रतीक्षा केली जाऊ शकत नाही. आज मला माझी फॅमिलीची खूप आठवण येत आहे.' कृष्णा अभिषेक सोबत तिने दोन्ही मुलांची देखील नावे लिहिली आहेत.