पुढारी ऑनलाईन डेस्क - काल रिलीज झालेल्या पुष्पा २ : द रूलच्या ट्रेलरने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. सुकुमार द्वारा दिग्दर्शित आणि अल्लू अर्जुन, फहाद फासिल आणि रश्मिका मंदाना अभिनीत या ट्रेलरने आधीच रेकॉर्ड तोड दिले आहेत. YouTube वर सर्वाधिक ४० मिलियन व्ह्यूज पर्यंत पोहोचणारा आणि १.४ मिलियनहून अधिक लाईक मिळवणारा ट्रेलर बनला आहे. (Pushpa-2)
दमदार कथा, ॲक्शन आणि बॅकग्राऊंड स्कोर त्याचबरोबर अल्लू अर्जुनच्या दमदार अभिनयाने खासकरून ॲक्शन सोबत ट्रेलरने या चित्रपटाला एका मोठ्या उंचीवर नेलं आहे. पण आता हा प्रश्न आहे की, काय पुष्पा २ बॉक्स ऑफिसवर १००० कोटी रुपये कमवू शकेल? (Pushpa-2 )
पुष्पा २ हा चित्रपट ५ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. अल्लू अर्जुन शिवाय या चित्रपटात रश्मिका मंदाना, फहाद फासिल यांच्या भूमिका आहेत.
अमेरिकेत आधी तिकीट बूक झालेले आहेत. तेलुगु भाषेतील चित्रपट बाहुबली सीरीज, सालार पार्ट १ आणि कल्की २८९८ एडी यांची युएसमध्ये चलती आहे. पुष्पा देखील रिलीज आधीच वर्ल्डवाईड पोहोचला आहे. रिपोर्टनुसार, युएसमध्ये ३१ हजार तिकिटे आधीच विक्री झालेली आहे. तर यातून ७.३६ कोटींचा गल्ला जमवला आहे.