केके मेननच्या दमदार अभिनयाने सजलेल्या स्पेशल ओप्सच्या पहिल्या सीझनने प्रेक्षकांचे कौतुक मिळवले. आता या सिरिजचा दूसरा सीझन येऊ घातला आहे. पण या सीझनबाबत फॅन्सना नाराज करणारी गोष्ट घडताना दिसून येते आहे.
ही सिरिज 11 जुलैला रिलीज होणार होती. पण आता तिची रिलीज डेट 8 दिवस पुढे गेली आहे. ही सिरिज18 जुलैला रिलीज होणार आहे.
जिओ हॉटस्टारने पोस्ट शेयर करत ही माहिती दिली आहे. ‘हिम्मत आणि त्याची टीम तयार आहे आणि हे वाट पाहणे नक्कीच सार्थकी लागणार आहे. स्पेशल ओप्स 2, सगळे एपिसोडस 18 जुलैपासून केवळ जिओ हॉटस्टारवर.’
या सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये हिम्मत सायबर आतंकवादाविरोधात लढण्यासाठी आपल्या विश्वासू टीमला पुन्हा एकत्र आणताना दिसतो आहे. ज्यामध्ये करण टॅकर, सैयामी खेर, विनय पाठक, मुजम्मिल इब्राहीम आणि मेहर वीज असे कलाकार आहेत. याशिवाय दुसऱ्या सीझनमध्ये प्रकाश राज, तोता रॉय चौधरी दिलीप ताहिल आणि गौतमी कपूर दिसणार आहेत. या सीझनमध्ये ताहिर राज भसीन या सीझनमध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसतो आहे.
स्पेशल ओप्सच्या पहिल्या सीझनची सुरुवात मार्च 2020 मध्ये झाली. त्यानंतर याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्या सीझनमध्ये सीक्रेट एजेंट हिम्मत सिंह एका आतंकवादी मास्टरमाइंडला पकडण्यासाठी गुप्त मिशनवर असल्याचे दाखवले होते. 19 वर्षांच्या या शोधाचा अंत या सिरिजमध्ये दाखवला होता.
यानंतर 2021 मध्ये स्पेशल ऑप्स 1.5: द हिम्मत स्टोरी नावाच्या प्रीक्वेल स्पिन ऑफने हिम्मत सिंह या व्यक्तीरेखेबाबत अधिक खुलासा केला गेला होता.
ए वेडनसडे, बेबी आणि स्पेशल 26 सारख्या लोकप्रिय सिनेमांची निर्मिती करणाऱ्या नीरज पांडे स्पेशल ऑप्सचे दिग्दर्शक आहेत.
अभिनेता के के मेनन यांनीही सिरिजची तारीख बदलण्यासंदर्भात इंस्टा पोस्ट करून नवीन तारीख चाहत्यांशी शेयर केली आहे.