अभिनेता आमीर खान सध्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. जेव्हापासून त्याने गौरीसोबतचे नाते जाहीर केले आहे. तेव्हापासून तो कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असतो. शिवाय अनेकदा त्याच्या आणि गौरीच्या नात्याबाबतही अनेक ठिकाणी बोलताना आढळतो.
आमीर खान म्हणतो, 'मी गौरीसोबत मनातून कधीच लग्न केले आहे. त्यामुळे आम्ही दोघे सोबत आहोत.’ अमीरच्या खुलाश्यामुळे अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. आमीरने पहिले लग्न रिना दत्तासोबत 1986 मध्ये केले होते. त्यानंतर 2002 मध्ये हे दोघे वेगळे झाले. यानंतर आमीर ने किरण रावसोबत लग्न केले.
त्यावेळी चर्चेत असलेले हे लग्न 2021 पर्यंत टिकले. या लग्नातून आमीरला आझाद नावाचा मुलगा ही आहे.
एका मुलाखतीमध्ये आमीरला गौरीसोबतच्या लग्नाबाबत आणि त्याच्या सध्याच्या नात्याच्या स्टेटसबाबत विचारले गेले. तेव्हा तो म्हणाला, ‘ मी आणि गौरी एकमेकांबाबत खूपच सीरियस आहे. आम्ही पार्टनर्स आहोत. एकमेकांबाबत कामिटेडही आहोत सध्या आम्ही एकत्र आहोत. मी गौरीशी मनातल्या मनात कधीच लग्न केले आहे. आता आम्ही याला औपचारिक रूप कधी द्यायचे हे नंतर ठरवले जाईल.
एका मुलाखती दरम्यान आमीर म्हणतो गौरी भेटण्याआधी मी स्वत:ला म्हातारा समजत होतो. पुन्हा लग्न करायचे नाही हे ठरवले होते. पण मी अचानक गौरीला भेटलो. मग आमच्यात मैत्री वाढली आणि पुन्हा प्रेमात पडलो. पण आताच लग्नाच्या फॉरमॅलिटीबाबत काही सांगू शकत नाही.
वर्क फ्रंटबाबत बोलायचे झाल्यास सितारे जमीन परच्या यशानंतर आमीर आता त्याच्या ड्रीम प्रोजेक्टकडे वळतो आहे. महाभारतावर आमीरचा आगामी ड्रीम प्रोजेक्ट असणार आहे. हा केवळ एक सिनेमा असणार नाही तर ही सिनेमा सिरिज असणार आहे. यात एकदम नवीन स्टार कास्ट असल्याचे बोलले जात आहे . अमीर या प्रोजेक्टबाबत बोलताना म्हणतो, महाभारत माझ्यासाठी केवळ एक सिनेमा नाही तर माझी तीव्र इच्छा शक्ति आहे. आमीर या सिनेमात कृष्ण किंवा अर्जुनाच्या भूमिकेत असणार नाही हे देखील त्याने स्पष्ट केले आहे.