“महाराष्ट्रातल्या विजयात तुमचाही वाटा” उद्धव ठाकरे यांच्याशी संभाषणानंतर किरण मानेंकडून पोस्ट

किरण माने-उद्धव ठाकरे
किरण माने-उद्धव ठाकरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्ही अभिनेता किरण माने नेहमीच सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतात. त्यांचे फॅन फॉलोईंग देखील मोठे आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर किरण मानेंनी आपली प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलीय. निकाल लागल्यापासून ते आजपर्यंत त्यांनी एक एक पोस्ट फेसबूकवर पोस्ट केलेली दिसते. त्यातील एक पोस्ट उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची आहे. ठाकरे यांच्यासोबत फोनवरून झालेल्या संभाषणाबद्दल किरण माने यांनी माहिती दिलीय. सोबत ठाकरेंसोबतचा एका फोटोदेखील त्यांनी पोस्ट केला आहे.

अधिक वाचा –

किरण माने यांनी पोस्टमध्ये काय म्हटलंय-

फोन सायलेंटवर होता. सहज हातात घेतला. बघतोय तर पंधरा मिन्टांपुर्वी उद्धवजींचे दोन मिस्ड काॅल्स येऊन पडलेवते ! नंतर 'जय महाराष्ट्र' असा मेसेज येऊन पडला होता. मी काॅलबॅक केला… उद्धवजींनी उचलला. मी काही बोलायच्या आधी त्यांनी बोलायला सुरूवात केली…

"किरणजी, महाराष्ट्रातल्या विजयात तुमचाही वाटा आहे. तुम्ही जे अफाट कष्ट घेतलेत त्याबद्दल आभार. सोबत राहू कायम." उद्धवजी बाळासाहेब ठाकरे माझ्याशी खुप काही बोलत होते… माझ्या डोळ्यांत आनंदाश्रू… शिवबंधनाचं सार्थक व्हायला सुरूवात झाली…
भाग गेला सीण केला । अवघा झाला आनंद ।।
– किरण माने.

अधिक वाचा – 

मी ठाकरेंसबोतचं का? किरण मानेंनी भाषणात केला होता खुलासा

८ मे रोजी सायंकाळी माँसाहेब मीनाताई ठाकरे मैदान, वाशी येथे महाविकास आघाडीच्या नेत्यांची सभा आयोजित केली होती. या सभेत अभिनेते किरण माने यांनी जोरदार भाषण केलं होतं. त्याचं हे भाषदेखील गाजलं होतं. किरण माने यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर म्हटलं होतं की, शिवसेना सार्वभौमिक आहे. जेव्हा राजकारणात गोंधळ असेल तेव्हा एकटा व्यक्ती लढत आहे. यासाठी मी एका संवेदनशील अभिनेत्याच्या रूपात एक माणूस म्हणून ठाकरे यांच्यासोबत येण्याचा निर्णय घेतला.

अधिक वाचा –

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news