

‘Kingdom’ चित्रपटाच्या सीक्वेलबाबत मोठी अपडेट समोर आली असून, निर्माते नागा वामसी यांनी बॉक्स ऑफिसवरील थंड प्रतिसादामुळे पुढील भाग रद्द करण्यात आल्याचे संकेत दिले आहेत. विजय देवरकोंडाच्या चाहत्यांसाठी ही बातमी निराशाजनक ठरत असून, सोशल मीडियावर यावर जोरदार चर्चा सुरू आहे.
तेलुगू सिनेसृष्टीतील बहुचर्चित चित्रपट ‘Kingdom’च्या सीक्वेलबाबत अखेर निर्मात्याकडून स्पष्टता मिळालीय. या चित्रपटाचे निर्माते नागा वामसी यांनी कन्फर्म केले आहे की, बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश न मिळाल्यामुळे ‘Kingdom’चा पुढील भाग रद्द करण्यात आला आहे.
नागा वामसी म्हणाले की, “चित्रपटाची कथा आणि मांडणी आमच्या दृष्टीने महत्त्वाची होती, मात्र बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा प्रतिसाद तितका सकारात्मक मिळाला नाही.” त्यांच्या या वक्तव्यानंतर ‘Kingdom Sequel’बाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
पहिल्या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील थंड प्रतिसादानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामुळे या फ्रँचायझी येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहेत. बऱ्याच दिवसापासून किंगडमच्या सीक्वलची चर्चा सुरु होती. जेव्हा निर्मात्याला एका मुलाखतीत विचारण्यात आलं की, हा चित्रपट एक उत्तम प्रदर्शन करू शकत होता, केवळ एक चित्रपट म्हणून ...सीक्वेल नव्हे. यावर ते म्हणाले, त्याविषयी बोलण्यात काही अर्थ नाही. कारण, यनमुळे केवळ दिग्दर्शक गौतम तिन्नानुरी यांनाच दु:ख होईल. आता करण्यासारखे काही राहिलेले नाही.
पण ते म्हणाले की, लवकरच दिग्दर्शश गौतम तिन्नानुरी सोबत पुन्हा काम करतील. गौतम आता एका वेगळ्या प्रकारच्या चित्रपटावर काम करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
बॉक्स ऑफिसवर किंगडम अयशस्वी
मागील वर्षी पिरीलज झालेला किंगडम अयशस्वी ठरला होता. त्यावेळी त्याचा लायगर देखील चित्रपट फारसा चालला नाही. विजय देवरकोंडासाठी ‘Kingdom’ हा चित्रपट करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात होता. पण किंगडममुळे आशा वाढल्या असताना फारसे प्रदर्शन किंगडम करू शकला नाही. मोठ्या बजेट नंतरही चित्रपटाने १०० कोटी देखील कमावले नाहीत. या चित्रपटात व्येंकटेश, भाग्यश्री बोरसे, सत्यदेव यांच्याही भूमिका होत्या. विजयने सूरीची भूमिका साकारली होती, जो एक कॉन्स्टेबल ते गुप्तेहर बनतो.