Sid Kiara Wed : सिद्धार्थ-कियारा पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात?

kiara-sidharth
kiara-sidharth
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडचे क्यूट कपल सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या लिंकअप आणि ब्रेकअपच्या बातम्या वारंवार येत असताना दोघांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. (Sid Kiara Wed) अश्विनी यार्डीच्या वाढदिवसाला दोघेही एकत्र दिसले. आता दोघांच्या लग्नाची चर्चा सुरू असून दोघे पुढील वर्षी २०२३ मध्ये लग्नबंधनात अडकतील, असे म्हटले जात आहे.

आतापर्यंत दोघांनीही त्यांच्या नात्यांविषयी खुलासा केलेला नाही. सिद्धार्थ आणि कियारा यांनी 'शेरशाह' या सुपरहिट चित्रपटात एकत्र काम केले आहे. चित्रपटाची कथा जेवढी आवडली, तेवढेच प्रेम त्यांच्या जोडीलाही मिळाले. या चित्रपटानंतर त्यांच्या डेटींगच्या बातम्या येऊ लागल्या. दोघंही फक्त मैत्रीचं नाव घेत असले तरी त्यांचे एकत्र फिरणे, एकत्र डिनर डेट, पार्टीत जाणे, यावरून त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगली होती. (Sid Kiara Wed)

करणच्या शोमध्ये करणने सिद्धार्थला विचारले होते की, आता तू कियारा अडवाणीला डेट करत आहेस, तर तुझे भविष्यातील प्लॅन्स काय आहेत. तसेच त्याच्या लग्नाबाबतही त्याला प्रश्न केला होता. याला उत्तर देताना सिद्धार्थ म्हणाला होता की, मी तुम्हाला उज्ज्वल आणि आनंदी भविष्याबद्दल बोलतो. सिद्धार्थच्या या उत्तरानंतर सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाची अटकळ बांधली जात होती. कियाराने करणच्या शोमध्ये जवळजवळ कबूल केले होते की ती सिडशी लग्न करण्यास तयार आहे. तसेच त्यावेळी तिने करण आणि शाहिद कपूर यांना त्यांच्या लग्नासाठी 'डोला रे' गाण्यावर नाचण्यासाठी आमंत्रितदेखील केले होते.

काय आहे वेडिंग प्लॅन?

सूत्रांच्या माहितीनुसार, "सिद्धार्थ आणि कियारा त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे बोलतात. कारण त्यांना एकमेकांबद्दल खात्री आहे. एप्रिल २०२३ मध्ये हे कपल लग्न करताना दिसतील. हा एक अतिशय खासगी कार्यक्रम असेल. बॉलिवूडमधील फार कमी लोकांना आमंत्रित केले जाईल. लग्नाचे बहुतांश कार्यक्रम दिल्लीत सिद्धार्थचे कुटुंबीय आणि नातेवाईक यांच्यात होणार आहेत. कियारा आणि सिडचे प्रथम नोंदणीकृत लग्न होईल आणि त्यानंतर रिसेप्शननंतर ते कॉकटेल पार्टी करणार का की त्यामध्ये सेलिब्रिटींनाही आमंत्रित केले जाईल हे देखील निश्चित झालेले नाही.

सिद्धार्थ आणि कियारा तीन वर्षांहून अधिक काळ रिलेशनशिपमध्ये आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news