KGF : ‘केजीएफ-2’ची अ‍ॅडव्हान्स बुकिंगने 65 कोटींची कमाई

KGF : ‘केजीएफ-2’ची अ‍ॅडव्हान्स बुकिंगने 65 कोटींची कमाई

पुढारी ऑनलाईन :  दाक्षिणात्य सुपरस्टार यश याच्या 'केजीएफ-2'ने प्रदर्शनापूर्वीच कमाईचा नवा विक्रम केला आहे. तिकिटांच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधूनच चित्रपटाला एकूण 65.10 कोटी रुपये मिळाले. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच तिकीट विक्रीतून एखाद्या चित्रपटाने केलेली ही सर्वाधिक कमाई आहे. हा चित्रपट मूळ कन्‍नड भाषेत असून तो हिंदी, तामिळ, तेलगू आणि मल्याळी भाषेतही प्रदर्शित झाला आहे.

तिकिटांची ही अ‍ॅडव्हान्स विक्री पाहूनच आता चित्रपटाच्या स्क्रीन्सची वाढ केली जात आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकाशिवाय आता गुजरातमध्येही 'केजीएफ-2'चा पहिला शो सकाळी सहा वाजता सुरू होईल. कर्नाटकात हा आतापर्यंतचा सर्वाधिक ओपनिंग घेणारा चित्रपट ठरेल. एकट्या बंगळूरमध्येच चित्रपटाच्या दहा कोटी रुपयांच्या अ‍ॅडव्हान्स तिकिटांची विक्री झाली आहे.

हेही वाचलत का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news