Kaushiki Chakraborty : संगीताच्या अनधिकृत वापरावर शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती आक्रमक; दिला कायदेशीर कारवाईचा इशारा

Kaushiki Chakraborty Music Copyright Issue : सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत संगीत सादरीकरणाच्या विनापरवानगी वापरावर नोंदवला आक्षेप
Kaushiki Chakraborty Music Copyright Issue
Published on: 
Updated on: 

Classical Singer Kaushiki Chakraborty Music Copyright Issue : कलाकाराच्या स्वतंत्र शैलीचा आणि सादरीकरणातील वैशिष्ट्यांचा योग्य मान राखणे आवश्यक आहे. आपल्या सादरीकरणातील संगीताचा परवानगीशिवाय आणि योग्य श्रेय न देता वापर आक्षेपार्ह आहे. अशा प्रकारे संगीताच्या अनधिकृत वापरावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रसिद्ध शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती यांनी दिला आहे.

कौशिकी चक्रवर्ती यांचा आक्षेप कशावर?

कौशिकी चक्रवर्ती यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी २०१५ मधील आपल्या प्रसिद्ध 'दरबार फेस्टिव्हल' मधील सादरीकरणाची तुलना 'वानमथी' या गाण्यासोबत करून दाखवली आहे. हे गाणे संगीतकार शब्बीर सुलतान यांच्या निर्मितीशी संबंधित असून, ते गायिका चिन्मयी श्रीपदा यांनी गायले आहे. कौशिकी यांच्या दाव्यानुसार, त्यांच्या सादरीकरणातील विशिष्ट सुरावटी आणि शैलीचा वापर या गाण्यात परवानगीशिवाय करण्यात आला आहे.

Kaushiki Chakraborty Music Copyright Issue
काश्मिरी गायिका शमिमा अख्तर यांनी गायले महाराष्ट्र गीत आणि पसायदान

कलात्मक योगदानाचा सन्मान राखला गेलाच पाहिजे

आपल्या सादरीकरणातील संगीताचा विनापरवानगी आणि कोणतेही श्रेय न देता वापर केल्याबद्दल कौशिकी चक्रवर्ती यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. या प्रकरणी संबंधित घटकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा स्पष्ट इशारा त्यांनी दिला असून, संगीत क्षेत्रातील कलाकारांचे हक्क व त्यांच्या कलात्मक योगदानाचा सन्मान राखला गेलाच पाहिजे, अशी आग्रही भूमिकाही त्यांनी मांडली आहे.

अखेर कायदेशीर मार्गाच्‍या अवलंबाचा निर्णय

आपल्या कलात्मक सादरीकरणावर यापूर्वीही संबंधित निर्मात्यांकडे आपली नाराजी व्यक्त करण्याचा आणि संवादातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याला सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने आणि योग्य तोडगा न निघाल्याने अखेर त्यांना कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे कौशिकी यांनी स्पष्ट केले आहे.

Kaushiki Chakraborty Music Copyright Issue
Sangeet Natya Mahotsav | पर्ये सत्तरी भूमिका देवी संगीत विद्यालयाचे 'संशयकल्लोळ' नाटक ठरले प्रथम

'हा केवळ रागाचा नव्हे, तर शैलीच्या सन्मानाचा प्रश्न'

"हा वाद केवळ एखाद्या रागाचा वापर करण्यापुरता मर्यादित नाही. कोणताही राग कोणीही वापरू शकतो; मात्र कलाकाराने स्वतःच्या मेहनतीतून विकसित केलेली स्वतंत्र शैली, सादरीकरणातील बारकावे आणि तिचे वैशिष्ट्य यांचा योग्य मान राखला गेला पाहिजे." एखाद्या कलाकाराच्या सर्जनशील योगदानाचा पुनर्वापर करताना त्याची अधिकृत दखल घेणे आणि आवश्यक त्या परवानग्या मिळवणे ही नैतिक व कायदेशीर जबाबदारी असल्याचेही त्यांनी ठणकावले आहे.

logo
Pudhari News
pudhari.news