Sangeet Natya Mahotsav | पर्ये सत्तरी भूमिका देवी संगीत विद्यालयाचे 'संशयकल्लोळ' नाटक ठरले प्रथम

Sangeet Natya Mahotsav | अजित केरकर यांच्या स्मरणार्थ संगीत नाट्य महोत्सव
Sangeet Natya Mahotsav
Sangeet Natya Mahotsav
Published on: 
Updated on: 

फोंडा : पुढारी वृत्तसेवा
ज्येष्ठ रंगकर्मी स्वर्गीय अजित केरकर यांच्या स्मरणार्थ ॐ कलासृष्टी बांदोडातर्फे माधवराव ढवळीकर ट्रस्टच्या सहकार्याने आयोजित संगीत नाट्य महोत्सवात पर्ये सत्तरी भूमिका देवी संगीत विद्यालयाच्या 'संशयकल्लोळ' नाटकाला प्रथम पुरस्कार प्राप्त झाला. द्वितीय पुरस्कार 'कधी तरी कोठे तरी' मोरजी दाडोबा क्रिएशन, तर तृतीय पुरस्कार कोरगावच्या रघुगोण शेट सांस्कृतिक कला मंडळाच्या 'कधी तरी कोठे तरी' या नाटकाला मिळाला.

Sangeet Natya Mahotsav
Goa BJP Damu Naik | मगोशी युती अन् फोंडा जागेचा पेच! निर्णय वरिष्ठच घेणार; भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचे विधान

उत्तेजनार्थ प्रथम तळावलीच्या महालक्ष्मी युवक संस्थेच्या 'अलख निरंजन', दुसरे पेडण्याच्या ओंकार थिएटरच्या 'ययाती आणि देवयानी' या नाटकाला तर तिसरे कोठंबी चंद्रेश्वर कलामंडळाच्या 'मत्स्यगंधा' या नाटकाला, चौथे बक्षीस मांड्रेच्या सातेरी नाट्य मंडळाच्या 'सौभद्र', तर पाचवे बक्षीस मडकईच्या होमकुंड संस्थेच्या 'तुझी वाट वेगळी' ला जाहीर झाले.

वैयक्तिक बक्षीसांत उत्कृष्ट दिग्दर्शक प्रथम शिवनाथ नाईक, द्वितीय अनिल आसोलकर, तर तृतीय बक्षीस रामदास परब यांना जाहीर झाले. उत्कृष्ट अभिनय पुरुष शिवनाथ नाईक प्रथम, विश्वजित फडते द्वितीय तर अभिषेक परब यांना तिसरे बक्षीस मिळाले. उत्कृष्ट अभिनय स्त्री मनीषा गावस पहिले, निवेदिता चंद्रोजी दुसरे तर श्रद्धा जोशी तिसरे बक्षीस मिळाले.

Sangeet Natya Mahotsav
Goa Assembly Election 2027 : फोंडा मतदारसंघात आमदारकीसाठी रस्सीखेच

उत्कृष्ट गायक पुरुष दशरथ नाईक पहिले, विठ्ठल गावस दुसरे तर दत्तगुरु केळकर तृतीय आला. स्त्री गटात शारदा शेटकर पहिले, स्नेहल गावस दुसरे, तर स्नेहल गुरव तिसरे बक्षीस मिळाले. उत्कृष्ट संवादिनी महेश गावस पहिले, शिवानंद दामोडकर दुसरे, तर सुरभी शेट तिसरे; उत्कृष्ट तबलावादक संकेत खलप पहिले, दत्तराज शेट्ये दुसरे, शैलेश शिरोडकर तिसऱ्या स्थानी आले.

उत्कृष्ट बाल कलाकार हार्दिक चोडणकर व नित्या गडेकर यांना बक्षिसे जाहीर झाली. प्रशस्तीपत्र सखाराम परब, पांडुरंग गावडे, प्रमोद परब, अमित सावंत, महादेव शेट्ये व कृष्णा सावंत यांना जाहीर झाले. परीक्षण सुभाष भागवत, प्रदीप शिलकर व शैलेश गावकर यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news