

पुढारी ऑनलाईन डेस्क - 'सिंघम अगेन'ने बॉक्स ऑफिसवर १५० कोटींचा आकडा पार केला आहे. तर कार्तिक आर्यनचा भूलभुलैया ३ कमाईच्या बाबतीत मागे पडला आहे. 'सिंघम अगेन - भूलभुलैया ३' रिलीज होऊन ५ दिवस झाले आहेत. 'सिंघम अगेन-भूलभुलैया ३' ने चार दिवसात १०० कोटी रुपये पार केले आहेत. जाणून घेऊया या चित्रपटांची कमाई किती झाली आहे?
सिंघम अगेनने बॉक्स ऑफिसवर सोमवारहून अधिक १८ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. 'सिंघम अगेन'ने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत १५० कोटींचा बिझनेस केला आहे. 'सिंघम अगेन'ने ४३.५० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. 'सिंघम अगेन'ने दुसऱ्या दिवशी ४२.५ कोटी, तिसऱ्या दिवशी ३५.७५, 'सिंघम अगेन'चा पाच दिवसांचे कलेक्शन १५३. २५ कोटी रुपये झाला आहे.
कार्तिक आर्यन स्टारर हॉरर कॉमेडी भूलभुलैया ३ बॉक्स ऑफिसवर खास कमाल दाखवू शकला नाही. सिंघम अगेन प्रमाणे भूलभुलैया ३ देखील पहिल्या वीकेंडमध्ये १०० कोटी रुपये कलेक्शन केले. ३६.७ कोटी रुपये ओपनिंग करणारा चित्रपट भूलभुलैया ३ ने पाचव्या दिवशी १३ कोटी रुपये कमावले. चित्रपटांचे एकूण कलेक्शन १३७ कोटी रुपयांचे झाले आहे.