

अभिनेत्री करिश्मा शर्मासोबत अत्यंत जीवघेणा अपघात घडला आहे. करिश्मा चालत्या ट्रेनमधून पडून जखमी झाली आहे. लोकल ट्रेनमधून चर्चगेटला जाताना तिने स्वत: ट्रेनमधून उडी मारली. हा किस्सा तिने स्वत: सोशल मिडियावर पोस्ट करून सांगितला आहे (Latest Entertainment News)
तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये तिने सगळा घटनाक्रम लिहिला आहे. ती लिहिते, ‘काल चर्चगेटला एका शूटिंगसाठी जात असताना मी साडी नेसली होती. तशातच मी ट्रेन पकडण्याचा निर्णय घेतला. मी ट्रेनमध्ये चढले ही. पण माझ्यासोबत असलेल्या मित्र- मैत्रिणींना धावत ट्रेन पकडायला जमली नाही. त्यामुळे मी धावत्या ट्रेनमधून उडी मारली. त्यामुळे माझ्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. माझ्या पाठीला मार लागला आहे. माझ्या डोक्याला सूजही आली आहे. डॉक्टरांनी एमआरआय करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे डोक्याला किती मार लागला आहे याचा अंदाज येईल. कालपासून मला प्रचंड त्रास होतो आहे. पण मी धैर्य ठेवले आहे. माझ्यासाठी प्रार्थना करा.
करिश्मा शर्माच्या मैत्रिणीने तिचा एक व्हीडियो शेयर केला आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे. ती म्हणते, मला विश्वास बसत नाही करिश्मासोबत असे झाले आहे. माझी मैत्रीण ट्रेनमधून पडली आहे. तिला काहीच आठवत नाही.
आम्ही तिला जमिनीवर पडलेले पाहिले आणि तिला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो. ती लवकर बरी होऊ दे.’
रागिणी mms रिटर्न्स आणि प्यार का पंचनामा या सिनेमात करिश्माने काम केले आहे.
उजडा चमन, एक व्हिलन रिटर्न, फिक्सर या सिनेमातील तिच्या भूमिकांनीही लक्ष वेधले.