करीनाच्या भावाने तारा सुतारियाला केलेलं डेट, आता गर्लफ्रेंड अलेखा आडवाणीशी साखरपुडा

Aadar Jain | करीनाच्या भावाने गर्लफ्रेंड अलेखा आडवाणीशी केला साखरपुडा
Aadar Jain Engagement
आदर जैनने अलेखा आडवाणीशी साखरपुडा केला Instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - 'कैदी बँड' फेम अभिनेता आदर जैन लवकरच बोहल्यावर चढणार आहे. त्याने गर्लफ्रेंड अलेखा आडवाणीला रोमँटिक अंदाजात लग्नासाठी प्रपोज केलं. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले आहेत. आदर जैन आणि अभिनेत्री तारा सुतारिया यांचा मागील वर्षी ब्रेकअप झाला होता.

Aadar Jain Engagement
Instagram

आदर जैनने गर्लफ्रेंडशी केला साखरपुडा 

आदर जैन - अलेखा आडवाणीचे फोटो इन्स्टाग्रामवर पाहायला मिळतात. आदरने समुद्र किनारी अलेखाला प्रपोज केलं. सोबत 'Marry Me' (माझ्याशी लग्न करशील) असा संदेश लिहिला होता. चेक्ड ब्लू-व्हाईट आऊटफिटमध्ये त्याने अलेखाला प्रपोज केले. गर्लफ्रेंडला अंगठी देखील घातली. यावेळी तिने यलो कलर आऊटफिट परिधान केला होता.

हे फोटो शेअर करत जैनने सांगितले की, अलेखा त्याची पहिली क्रश आणि बेस्ट फ्रेंड आहे. कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंकी, "माझी पहिली क्रश, माझी बेस्ट फ्रेंड आणि फॉरएव्हर." त्याने अंगठी आणि हार्ट इमोजी देखील शेअर केलीय. आदरच्या साखरपुड्यानंतर चुलत बहिण रिद्धिमा कपूर, करीना कपूर खान, करिश्मा कपूर, अंशुला कपूर आणि शनाया कपूरसह अनेक सेलिब्रिटीजनी अभिनंदन केले आहे.

तारा सुतारियाला डेट केलं होतं आदर जैनने

आदर जैन आधी तारा सुतारियाला डेट केलं होतं. दोघांनी आपले रिलेशनशिप २०२० मध्ये जाहीर केले होते. तारा प्रत्येक सणाला खास औचित्याने जैन वा कपूर परिवारात स्पॉट व्हायची, पण २०२३ मध्ये तारा-आदर यांच्या ब्रेकअपच्या वृत्ताने तिच्या फॅन्सला धक्का बसला.

Aadar Jain Engagement
Marathi OTT : सप्टेंबरमध्ये मराठी ओटीटीवर विविध भाषेतील चित्रपट भेटीला

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news