Marathi OTT : सप्टेंबरमध्ये मराठी ओटीटीवर विविध भाषेतील चित्रपट भेटीला

सप्टेंबरमध्ये मराठी ओटीटीवर विविध भाषेतील चित्रपट भेटीला
Marathi OTT
सप्टेंबरमध्ये मराठी ओटीटीवर विविध भाषेतील चित्रपट भेटीला Marathi OTT film
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : तुमचा विकेंड मनोरंजक बनेल अशा चित्रपटांच्या शोधात आहात...? तर थांबा. सप्टेंबर महिन्यातील दर शुक्रवारी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर सुपरहिट चित्रपट पाहायला मिळणार आहेस. मोठ्यापासून ते लहान मुलांपर्यंत साऊथ आणि हॉलिवूडचे कलेक्शन आणले आहे आणि तेही मराठी डबमध्ये. चला पाहू कोणते आहेत ते चित्रपट…

Unnai Kann Theduthey (दुहेरी)

साऊथमधील 'बाहुबली' आणि 'मुंज्या'सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये भूमिका साकारणारे सत्यराज 'उन्नई कान थेडुथे' म्हणजे, मराठीत दुहेरी या तामिळ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट ६ सप्टेंबर २०२४ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर प्रेक्षकांसाठी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जो मुख्य अभिनेता आहे तो एक अंडरकव्हर पोलीस आहे. ज्याला नदीच्या काठावर एक मृतदेह सापडतो आणि त्या मृतदेहाजवळ दोन पुरावे सापडतात. आणि याच पुराव्यांच्या माध्यमातून गुन्हेगाराच्या शोधात तो लग्नात पोहोचतो आणि सर्वांचा गोंधळ उडतो. त्याच गुप्त मृतदेहाचे रहस्य या कहाणीची झोप उडवते.

Trail of Justice (मार्ग न्यायाचा)

हॉलीवूडचा 'ट्रेल ऑफ जस्टीस' चित्रपट म्हणजेच मार्ग न्यायाचा. हा चित्रपट १३ सप्टेंबर २०२४ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार असून "ट्रेल ऑफ जस्टिस" हा एक पाश्चात्य चित्रपट आहे जो गृह युद्धानंतर घडतो. या चित्रपटातील कथा जेफ आणि सिडनी लॉसन या दोन चुलत भावंडांची आहे, ज्यांनी ड्र्यू वेस्ली नावाच्या कुशल बंदूकधारी व्यक्तीला वाईट लोकांच्या गटातून वाचवले असते. एकत्रितपणे, त्यांना क्ले हॉब्स नावाच्या बाहेरील नेत्यापासून शहराचे संरक्षण करायचे असते जो सर्वांचा खूप छळ करत असतो. अशा या दोन लढाऊ भावांची कहाणी तुमच्या भेटीला लवकर येत आहे.

Gowdrudugru (फक्त तुझ्यासाठी)

भरपूर कॉमेडी आणि ड्रामा असलेला हा कन्नड चित्रपट गौद्रुदुगरु म्हणजे 'फक्त तुझ्यासाठी' २० सप्टेंबर २०२४ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर मराठीत प्रदर्शित होणार आहे. जन्मापासून अनाथ असलेल्या दोन मुलांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे.

Marathi OTT
Marathi OTT : ‘पथम वालवू’ मल्याळम चित्रपट मराठी ओटीटीवर पाहता येणार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news