

Karanveer Mehra on Insecurity
मुंबई - असुरक्षितते वर औषध उपलब्ध असायला हवे होते का, अॅलोपॅथी, होमिओपॅथी कारण मला फक्त अशा लोकांबद्दल सहानुभूती आहे..असे एक्स अकाऊंटवर अभिनेता करण वीर मेहराने ट्विट केलं आहे. करण वीर मेहराची 'असुरक्षितते'वरील हे एक गूढ ट्विट असल्याचे युजर्स म्हणत आहेत. पण नेमकी कशाची असुरक्षितता वाटतेय, हे त्याने ट्विटमध्ये लिहिलेलं नाही. आता नेटकऱ्यांनीही त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
बिग बॉस १८ आणि खतरों के खिलाडी १४ जिंकल्यापासून करण वीर मेहरा खूप चर्चेत आहे. त्याला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे. सलमान खानचा शो जिंकल्यानंतर त्याने आता त्याचा पहिला चित्रपट साईन केला आहे, ज्याचे दिग्दर्शन ओमंग कुमार करत आहेत. चित्रपटात तो 'सनम तेरी कसम' फेम हर्षवर्धन राणे सोबत दिसणार आहे. या चित्रपटात 'द डिप्लोमॅट' फेम अभिनेत्री सादिया खातीब देखील असेल. आता तो चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्यासही सज्ज आहे. दरम्यान, त्याने केलेले ट्विट चर्चेत आले आहे.
करण वीर मेहराने एक्सवर एक नोट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने 'असुरक्षितते'बद्दल भाष्य केले आहे. अभिनेत्याने लिहिले आहे की, "असुरक्षिततेवर औषध उपलब्ध असते तर बरे झाले असते. अॅलोपॅथी, होमिओपॅथी कारण माझ्याकडे फक्त अशा लोकांबद्दल सहानुभूती आहे."
करण वीर मेहराची एक्स पोस्ट व्हायरल होत आहे आणि नेटिझन्सनी त्याच्या ‘असुरक्षितते’वरील वादग्रस्त ओळीवर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका यूजरने लिहिले की, “भाई मत हुआ करो असुरक्षित तुम, तुमने तो बीबी मी स्वीकार किया था असुरक्षितता.” दुसरा वापरकर्ता म्हणाला, "ऐसा दवा है तो पहले खुद कोशिश कर लेना. क्यूंकी आपके बोहोत सारे ऍक्शन्स से आप बोहोत असुरक्षित आणि अपरिपक्व लगते हो! अभिनय के लिए भी दवा लेना, वो इंडिया-पाक वाला कविता देखा था, बोहोत मैं घटिया अभिनय है!"
करण वीर मेहराची एक्स पोस्ट व्हायरल होत आहे आणि नेटिझन्सनी त्याच्या ‘असुरक्षितते’वरील वादग्रस्त ओळीवर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका यूजरने लिहिले की, “भाई मत हुआ करो असुरक्षित तुम, तुमने तो बीबी (Bigg Boss) मे स्वीकार किया था असुरक्षितता.” दुसऱ्याने म्हटले, "ऐसा दवा है तो पहले खुद कोशिश कर लेना. क्यूंकी आपके बोहोत सारे ॲक्शन्स से आप बहुत असुरक्षित आणि अपरिपक्व लगते हो! अभिनय के लिए भी दवा लेना, वो इंडिया-पाक वाला कविता देखा था, बहुत घटिया अभिनय है!"...
करणवीर मेहराने २००५ मध्ये 'रीमिक्स' मालिकेतून टीव्हीवर डेब्यू केलं होतं. 'पवित्र रिश्ता', 'बडे अच्छे लगते हैं', 'जिद्दी दिल माने ना' यासारख्या मालिकेतून तो प्रकाशझोतात आला.