Ashok Saraf | दिलखुलास अशोक सराफ ! ५८ वर्षांच्या चित्रपट सृष्टीतील उलगडला प्रवास

अशोक सराफ यांच्यासोबत झालेल्या दिलखुलास गप्पांमुळे दिल्लीकर मंत्रमुग्ध
Ashok Saraf in Delhi Speech
दिल्लीतील मुलाखतीत अशोक सराफ दिलखुलासपणे व्यक्त झाले.(Pudhari Photo)
Published on
Updated on
प्रशांत वाघाये

Ashok Saraf in Delhi Speech

नवी दिल्ली : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना अलीकडेच राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री सन्मान प्रदान करून गौरविण्यात आले. त्यानिमित्त ते दिल्ली दौऱ्यावर होते. पुरस्काराच्या निमित्ताने दिल्लीतील मराठी अधिकारी सौरभ देशमुख आणि सनदी लेखापाल धनश्री देशमुख यांनी अशोक सराफ यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. याप्रसंगी दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये अशोक सराफ यांचा सत्कार करण्यात आला. सौरभ देशमुख यांनी भारतीय डाक विभागातर्फे अशोक सराफ यांचा फोटो असलेले मायस्टाम्प टपाल तिकीट भेट दिले.

दिल्लीतील मराठी माणसाने केलेला हा सत्कार माझ्यासाठी खूप जिव्हाळ्याचा आहे. पद्मश्री सन्मान मिळणे म्हणजे माझ्या आजवरच्या कामाचे चीज झाले, असे भावोद्गार अशोक सराफ यांनी काढले आणि आजवर भरभरून प्रेम केलेल्या प्रेक्षकांचेही आभार मानले. अशोक सराफ यांच्यासोबत झालेल्या दिलखुलास गप्पांमुळे ही संध्याकाळ दिल्लीकरांना मंत्रमुग्ध करणारी होती, अशा भावना उपस्थितांनी बोलून दाखवल्या.

Ashok Saraf in Delhi Speech
Padma Awards 2025 : अशोक सराफ यांच्यासह 5 मान्यवरांना पद्मश्री

या सत्कार सोहळ्याला राष्ट्रीय तपास संस्थेचे महासंचालक सदानंद दाते, निवृत्त व्हाईस ऍडमिरल सतिशकुमार घोरमाडे, निवृत्त परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे, केंद्रीय अतिरिक्त शिक्षण सचिव आनंद पाटील आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर सुनील देवधर, वैभव डांगे, महेंद्र लद्धा, अभिनेते पंकज पंचारिया, भक्ती कुलकर्णी आदी दिल्लीकर मंडळीही अशोक सराफ यांच्या सत्कार कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. महाराष्ट्रातील खासदार निलेश लंके, भास्कर भगरे यांनीही कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावली. या कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी अशोक सराफ यांचे अभिनंदन केले.

सत्कार कार्यक्रमानंतर 'दै. पुढारी'चे दिल्लीतील पत्रकार प्रशांत वाघाये यांनी अशोक सराफ यांची प्रकट मुलाखत घेतली. या मुलाखतीत अशोक सराफ दिलखुलासपणे व्यक्त झाले. मामांच्या कंपनीत केलेले पहिले नाटक, पांडू हवालदार हा पहिला चित्रपट, नव्या पिढीतील अभिनेत्यांसोबतचा अनुभव अशा अनेक गोष्टी, आपला ५८ वर्षांचा चित्रपट सृष्टीतील प्रवास आणि यादरम्यान आलेले वेगवेगळे अनुभव, किस्से अशोक सराफ यांनी सांगितले. याप्रसंगी सराफ कुटुंबातून अशोक सराफ यांचे बंधू सुभाष सराफ, पुतण्या सिद्धार्थ सराफ आणि नातेवाईक सुनील परांजपे हे देखील आवर्जून उपस्थित होते.

Ashok Saraf in Delhi Speech
Ashok Saraf | पद्मश्री हा सन्मान म्हणजे आजवरच्या माझ्या कष्टाचे चीज: अशोक सराफ यांचे भावोद्‌गार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news