Shahrukh : करण जोहरची भावूक पोस्ट, “२९ वर्षे! शाहरुखसोबतची मैत्री आताही…”(Video)

shahrukh khan and karan johar
shahrukh khan and karan johar

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड मेगास्टार शाहरुख खान (Shahrukh) आपला ५७ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जवळचा मित्र आणि चित्रपट निर्माता करण जोहरने खास नोट शेअर करून सांगितले आहे की, शाहरुख त्याच्या आयुष्यात किती महत्त्वाचा आहे. करणने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये शाहरुखसोबत त्याचे जुने फोटो आहेत. करणने एक लांबलचक पोस्टदेखील लिहिली आहे. (Shahrukh)

करण जाेहर याने अआपल्‍या पाेस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, "चित्रपट करण अर्जुन होता, सेट फिल्म सिटीमध्ये होता, माझे वडील आणि मी एका व्यावसायिक बैठकीसाठी पोहोचलो होतो. मला चित्रपटाच्या अनेक स्टार्सबाबत शंका होती. काही निश्चितपणे स्टारडस्ट होते. तर मी या नव्या यशस्वी स्टार्सबाबत विचार केला. तेव्हा त्याला मोठा हिट चित्रपट दीवानासाठी ओळखलं जायचंय तेव्ही मी तेथे होतो. माझे वडील आनंदाने त्याला भेटले आणि त्याला एक आलिंगन दिलं."

"यानंतर त्याने माझ्या हातात हात दिला आणि आपल्या खूप दयाळू डोळ्यांनी अस्तित्वात नसलेल्या करिअर आणि जीवनाविषयी विचारले. माझी उत्तरे खूप वाईट होती. तरीही त्याने खूप लक्षपूर्वक माझं म्हणणं ऐकलं. तेव्हा मला वाटलं होतं की, मी दा विंची कोड क्रॅक केले आहे. आता दीर्घकाळ झाला आहे. जवळपास तीन दशके, २९ वर्षे. आणि त्याच्यासोबतची मैत्री आताही दृढ होत आहे. "आज मी त्याला भाई म्हणतो, आणि तो आतादेखील मला लक्षपूर्वक ऐकतो. त्याचे दयाळू डोळे आणि ते व्यक्तीत्व! त्या शब्दाचा अर्थ केवळ शाहरुख आहे.", असेही करण याने आपल्‍या पाेस्‍टमध्‍ये नमूद केले आहे.

करण आणि शाहरुखने 'कुछ कुछ होता है', 'कल हो ना हो', 'कभी खुशी कभी गम', 'कभी अलविदा ना कहना' आणि 'माय नेम इज खान' यासारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news