Karan Johar Troll | ‘नेपोकिड का दाईजान’ म्हटल्याने संतापला करण जोहर; ट्रोलर्सना फटकारत म्हटले...

Karan Johar Troll | ‘नेपोकिड का दाईजान’ म्हटल्याने संतापला करण जोहर; ट्रोलर्सना फटकारत म्हटले...
image of Karan Johar and saiyaara movie poster
Karan Johar answered to Trollers Instagram
Published on
Updated on

Karan Johar answered to Trollers

मुंबई - करण जोहरने अहान पांडेचा चित्रपट सैयाराचे कौतुक केले. पण त्यानंतर मात्र त्याला ट्रोलर्सकडून टीकेला सामोरं जावं लागलं. पण गप्प बसेल तो करण जोहर कसला? जाणून घेऊया नेमकं काय प्रकरण आहे?

image of Karan Johar and saiyaara movie poster
Sachin Pilgaonkar | जेव्हा ऑटोग्राफ घेण्यासाठी संजीव कुमार पोहोचले होते सचिन पिळगावकरांच्या घरी, वाचा किस्सा

सैयारा रिलीज झाल्यानंतर करण जोहरने एक मोठी पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्याने चित्रपटाचे कौतुक केले होते. करणची पोस्ट समोर आल्यानंतर एका ट्रोलरने पुन्हा एकदा नेपोटिझमचा मुद्दा उपस्थित केला. त्याने करणला 'नेपोकिड की दाईजान' म्हटलं. यावर करणने ट्रोलरला सडेतोड उत्तर दिले आहे.

करण जोहरच्या पोस्टमध्ये काय लिहिलंय?

करणने अहान पांडेच्या सैयारा चित्रपटाचे कौतुक करताना लिहिलं- 'मला आठवत नाही, एखादा असा चित्रपट, जो आता हा चित्रपट पाहून अनुभव आलाय, डोळ्यांतून अश्रू वाहत होते, पण मनात एक खूप आनंद देखील होता. आनंद या गोष्टीचा की एक सुंदर प्रेम कहाणीने सिल्व्हर स्क्रीनवर यश मिळवलंय. आणि संपूर्ण देशाला पुन्हा प्रेमात पाडलंय. मला सर्वात अधिक अभिमान याचा आहे की, जिथून मी सुरुवात केली होती, यशराज फिल्म्सने पुन्हा एकदा खरं प्रेम परत आणलं आहे. चित्रपटांमध्ये आणि आमच्या चित्रपट इंडस्ट्रीमध्ये. आदित्य (चोप्रा), मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि हे सांगण्यासाठी खूप अभिमान वाटत आहे. मी नेहमीसाठी यशराज फिल्म्सचा स्टुडेंट आहे. अक्षय विधानी, तू एक निर्माता म्हणून डेब्यू कमालीचा आहे. हा बॉल तर थेट मैदानाबाहेर गेला आहे. खूप शानदार काम. अभिनंदन.'

यानंतर करण जोहरच्या पोस्ट कॉमेंटमध्ये एकाने लिहिलं- 'आ गया नेपोकिड का दाईजान'

image of Karan Johar and saiyaara movie poster
Rinku Rajguru | सैराट झालं जी! पहिलं ते पहिलच असतं; 'आर्ची'चा जबरदस्त डान्स, व्हिडिओ पहा

त्याच्या उत्तरात करण जोहरने लिहिलं, 'गपचुप बस, घरात बसल्या-बसल्या नेगेटिव्हिटी पसरवू नकोस. दोन मुलांचे काम पाहा आणि स्वत:काही तरी काम कर..' दोघांचे हे उत्तर प्रत्युत्तर खूप व्हायरल होत आहे.

सैयारा बॉक्स ऑफिस कलेक्शन

सैयारा १८ जुलैला चित्रपटगृहात रिलीज जाला आहे. अहान पांडेने चित्रपटातून बॉलीवूड डेब्यू केला आहे. पहिल्या दिवशीची कमाई २८ कोटी रुपये होता. तिसऱ्या दिवशी रविवरी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमकूळ घातला. तीन दिवसात चित्रपट १०० कोटींच्या जवळ पोहोचले आहे. रिपोर्टनुसार, दोन दिवसात ६७ कोटींचा गल्ला जमवला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news