

आपल्या हटके आणि अतरंगी गाण्यांनी संगीतविश्वात एक आगळे स्थान निर्माण केलेला कलाकार म्हणजे यो यो हनी सिंग. दरवेळी आपल्या गाण्यांमुळे चर्चेत असलेला हनी सिंग आता एका वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. हनी सिंगने ए आर रहमान यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानामुळे त्यांच्या सहीचा टॅटू बनवला आहे.
हनी ने व्हीडियो शेयर करत चाहत्यांशी ही बाब शेयर केली आहे.
जीवंत दंतकथा असा कॅप्शनमध्ये उल्लेख करत हनी सिंगने हा व्हीडियो शेयर केला आहे. तसेच संगीत क्षेत्रातील रहमान यांच्या योगदानाचे कौतुक केले आहे.
या व्हीडिओत हनी सिंग तू ही रे हे बॉम्बे सिनेमातील गाणे गाताना दिसतो आहे. त्याने उजव्या खांद्यावर सहीचा टॅटू गोंदवला आहे.
या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, ‘माझे प्रिय लिव्हिंग लेजंड सरांसाठी एका रात्रीत तिसरा टॅटू. मी तुमच्यावर प्रेम करतो. प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद.’ हनी सिंगने यापूर्वीच रहमान यांच्यासोबत काम करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. हा ट्रॅक ग्रॅमी योग्य असावा यासाठी प्रयत्न करण्याचेही त्याने यावेळी सांगितले.
अलीकडेच हनी सिंगने अभिनेत्री नर्गिस फाखरी आणि आंतरराष्ट्रीय कलाकार ग्रीनि सोबत आपला संगीत व्हीडियो तेरी यादे रिलीज केला आहे.
हे गाणे त्याचा अल्बम ग्लोरीचा हिस्सा आहे. या अल्बमच्या माध्यमातून हनी सिंगने पुनरागमन केले आहे. या अल्बममध्ये 10 वेगवेगळ्या भाषांमधील गाणी समाविष्ट आहेत.
हनी सिंग त्याच्या पर्सनल लाईफसाठी कायमच चर्चेत असतो. आताही त्याने एका रात्रीत तीन टॅटू काढले आहेत. त्यातील तिसरा ए आर रहमान यांच्यासाठी तर पहिला आईसाठी टॅटू काढला आहे. आईच्या सहीच्या टॅटू त्याने काढला आहे. याशिवाय या टॅटूमध्ये गर्भात नाळेशी जोडलेले बाळही दिसत आहे. त्याच्या या टॅटूचे सर्वजण कौतुक करत आहेत.
हनी सिंग सध्या त्याच्या आगामी गाणे 6.00 AM साठी चर्चेत आहे. त्याचे हे नवीन गाणे 15 जुलैला रिलीज होत आहे. यात हनी सिंगसोबत हिरा सोहलची जोडी दिसणार आहे.