

Kis Kisko Pyaar Karoon 2 release date-cast
मुंबई - कॉमेडीयन कपिल शर्माचा नव्या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज झाले असून प्रदर्शनची तारीख आणि कलाकार देखील कोण असतील, हे कन्फर्म करण्यात आले आहे. कपिल शर्माचा किस किस को प्यार करू हा चित्रपट २०१५ मध्ये रिलीज झाला होता. आता पुन्हा मोठ्या पड्यावर या चित्रपटाचा सीक्वल येतोय. निर्मात्यांनी चित्रपटाचे मोशन पोस्टर जारी करत रिलीज डेटची अधिकृत घोषणा केलीय. सोबतच चित्रपटामध्ये कपिच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या चारी अभिनेत्री कोण असतील, याबाबत देखील खुलासा केला आहे. (latest entertainment news)
चित्रपटाचे नवे पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले असून त्यात कपिल शर्मा पुन्हा एकदा आपल्या खास स्टाईलमध्ये दिसत आहे. सोशल मीडियावर हा पोस्टर व्हायरल झालाय. ‘किस किसको प्यार करूं’ या चित्रपटात कपिलची तीन पत्नी आणि एक गर्लफ्रेंड अशा विनोदी गोंधळावर आधारित कथा होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत कपिलचा सिनेमॅटिक डेब्यू सुपरहिट ठरला होता. आता दुसऱ्या भागात कपिलच्या व्यक्तिरेखेत आणखी भन्नाट ट्विस्ट असणार असल्याचं दिग्दर्शकांनी सांगितलं आहे.
कपिल शर्माने इन्स्टाग्राम वर मोशन पोस्टर शेअर करत लिहिले आहे- Get ready for double the confusion, and 4 times the fun! #KisKiskoPyaarKaroon2, laugh riot begins only In Cinemas on 12th December 2025
कपिल शर्माने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या मजेशीर मोशन पोस्टर शेअर केला आहे. त्यामध्ये सर्व अभिनेत्री वधू वेषात दिसत आहेत.
पोस्टरमध्ये चारीही वधू कपिलला डोलीमध्ये उचलून धरलेल्या दिसताहेत. त्याच्या मागे त्याचा मित्र मनजोत सिंह देखील दिसत आहे. पोस्टर रिलीज होताच सोशल मीडियावर फॅन्सच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झालीय.