

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने मॉडेल महीका शर्मासोबतचं नातं अधिकृत केलं आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या रोमँटिक फोटोंमुळे दोघांची जोडी सध्या चर्चेत आली आहे. फॅन्सनी कमेंट्स करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
Hardik Pandya - Mahieka Sharma relationship Official
मुंबई - भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, मात्र या वेळी कारण क्रिकेट नव्हे तर त्याचं खासगी आयुष्य आहे. अलीकडेच हार्दिकने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत, ज्यातून त्याने मॉडेल माहीका शर्मासोबतचं नातं अधिकृत केल्याचं स्पष्ट होत आहे. क्रिकेट विश्वातील हा नवा ‘लव्ह एंगल’ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. काही तासांतच फोटोंना लाखो लाईक्स आणि हजारो कमेंट्स मिळाल्या आहेत. हार्दिकचा हा रोमँटिक अंदाज पाहून चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे.
फोटोंमध्ये हार्दिक आणि माहीका दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ दिसत आहेत. दोघांच्या चेहऱ्यावरचं स्मित आणि लाजरा भाव पाहून चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. हार्दिकने या पोस्टसोबत लिहिलं – Blessed. सोबतच माहिका शर्मासोबतचे काही फोटो शेअर केले. त्यामुळे त्याने आपलं रिलेशन कन्फर्म केलं असल्याचं स्पष्ट होतं.
माहीका शर्मा ही ग्लॅमरस मॉडेल असून, तीने अनेक जाहिराती आणि म्युझिक व्हिडिओंमध्ये काम केलं आहे. दोघांच्या अफेअरच्या चर्चा काही आठवड्यांपासून सुरु होत्या, मात्र आता हार्दिकने स्वतःचं नातं ऑफिशियल केल्याने या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.
आता हे कन्फर्म झाले आहे की, हार्दिक पांड्या-मॉडल माहिका शर्मा एकमेकांना डेट करत आहेत. मागील काही आठवड्यांमध्ये दोघांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केले होते. आता हार्दिकने माहिका सोबत रोमँटिक आणि व्हेकेशनचे फोटो शेअर केले आहेत. काही फोटोंमध्ये तो आपल्या मुलासमवेतही दिसत आहे. तर काही फोटोंमध्ये तो आणि माहिका फोटोसाठी पोज देताना दिसताहेत.
काही फोटोंमध्ये माहिका शर्मा-हार्दिक पांड्याला एकमेकांचा हात पकडलेला दिसतो. हार्दिक दुसऱ्या फोटोत एका लाल शर्टमध्ये समुद्र किनारी बसलेला दिसतो. त्याच्या चारीकडे फेयरी लाईट्स सजलेले दिसतात. यामुळे हे संकेत मिळते की, तो माहिका सोबत डेटवर होता. काही फोटोंमध्ये हार्दिक पांड्याला स्वयंपाक करतानाही पाहिलं जाऊ शकतं.
माहिका शर्माने मनीष मल्होत्रा, अनीता डोंगरे, तरुण तहिलियानी यासारख्या टॉपच्या भारतीय डिझायनर्ससाठी रॅम्प वॉक केला आहे. २०२४ मध्ये माहिकाला भारतीय फॅशन ॲवार्ड्समध्ये "मॉडल ऑफ द ईयर (न्यू एज)" पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. माहिका शर्मा आपल्या प्रोफेशनलिजमसाठीही ओळखली जाते.
हार्दिक पांड्याने आधी अभिनेत्री नताशा स्टेनकोविकशी लग्न केले होते. दोघांनी मे २०२० मध्ये विवाह केला होता. पण त्यांचे नाते फार काळ टिक शकले नाही आणि दोघांनी घटस्फोट घेतला.