

kapil sharma cafe canada firing case
मुंबई - कॅनडामध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगने पुन्हा कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅप्स कॅफेवर गोळीबार केला. कॅनडा सरकारने जेव्हापासून या गँगला दहशतवादी संघटना संबोधले आहे, तेव्हापासून सातत्याने या घटना होत आहेत. लॉरेन्स बिश्नोई गँगने या गोळीबाराची जबाबदारी घेतलीय. कॅनडामध्ये विविध ठिकाणी गोळीबार गँगकडून होत असून आताचा गोळीबार कॅनडा ब्रँपटन (Brampton) परिसरात झाला. (latest entertainment news)
कॅनडामध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगने पुन्हा एकदा कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार केला. १६ ऑक्टोबर रोजी सकाळी कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार झाला आणि त्याच दिवशी सायंकाळी एका बिजनेसमॅनच्या हवेलीवर देखील गोळीबार झाला. सोशल मीडियावर या गोळीबाराची जबाबदारी त्या गँगस्टर्स गोल्डी ढिल्लनने घेतली आहे. कपिल शर्माच्या कॅफेवर पहिल्या हल्ल्याची जबाबदारी त्यांनीच घेतली होती. या गोळीबाराच्या घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कॅफेवर ९-१० गोळ्या झाडण्यात आल्या. त्या कॅफेच्या भिंतीवर काचेच्या तुकडे आणि बुलेट होल्स झाले आहे.
या गोळीबारात कोणीही जखमी किंवा जीवित हानी झाली नाही. कॅनडा सरकारने जेव्हापासून लॉरेन्स बिश्नोई गँगला दहशतवादी संघटना जाहीर केले आहे, तेव्हापासून कॅनडामध्ये विविध ठिकाणी गोळीबार या गँगकडून होत आहे.
लॉरेन्स बिश्नोई गँग कडून गोळीबाराच्या या घटनेबद्दल गोल्डी ढिल्लोने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं, 'सत श्री अकाल... मी गोल्डी ढिल्लो, लॉरेन्स बिश्नोई गँगमधून आहे. जमीनदार बार अँड ग्रिल (२९५ क्वीन स्ट्रीट ई, ब्रॅम्पटन) मध्ये जे शूटिंग झाले, त्याची जबाबदारी मी घेतो. याचा आमच्या पैशांशी कोणताही वाद नव्हता. फक्त त्याला थोडी अद्दल घडवायची होती. आता तर केवळ ट्रेलर आहे, चित्रपटात जीव देखील जाऊ शकतो. जर कुणी आदर करू शकत नसेल.'