

दिवाळी संपताच चाहूल लागते ती लग्नसराईची. मराठी सिनेसृष्टीतही सध्या लग्न आणि साखरपुड्याचे वारे वाहू लागले आहेत. मराठी मालिका आणि सिनेमात दिसलेल्या अभिनेत्रीनी त्यांच्या साखरपुड्याचे फोटो शेयर केले आहेत. या अभिनेत्री आहेत शिवानी नाईक आणि तेजस्विनी लोणारी. (Latest Entertainment News)
अप्पी आमची कलेक्टर या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री शिवानी नाईकचा नुकताच साखरपुडा झाला आहे. शिवानीने अभिनेता अमित रेखीसोबत साखरपुडा केला आहे. या दोघांच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.
अमितही अभिनेता असून ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत तो दिसला होता. 'सध्या तो पिंगा ग पोरी पिंगा' या मालिकेत दिसतो आहे. अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी या साखरपुड्याला हजेरी लावली होती. रंगभूमीवर शिवानी आणि अमितची ओळख झाली. पर्पल आणि रेड साडीमध्ये शिवानी खूपच क्यूट दिसत होती.
बिग बॉसमध्ये झळकलेली अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिचा साखरपुडा नुकताच संपन्न झाला. शिवसेना पक्षाचे युवा नेते समाधान सरवणकर हे तेजस्विनीचे भावी पती आहेत. शिवसेना नेते सदा सरवणकर यांचा समाधान हा मुलगा आहे.
तेजस्विनीने छापा काटा, चित्तोड की राणी पद्मिनी का जोहूर, गुलदस्ता, दोघात तिसरा आता सगळं विसरा, अफलातून या सिनेमात काम केले आहे. तुझेच मी गीत गात आहे मालिकेतही तेजस्विनीने काम केले आहे. लाल रंगाची साडी आणि हिरव्या बांगड्या तेजस्विनीला स्पेशल लूक देत होत्या.