

पुढारी ऑनलाईन डेस्क - एकीकडे साऊथ सुपरस्टार सूर्या (Suriya) चा आगामी चित्रपट कंगुवा (Kanguva) ची रिलीजची तयारी सुरु आहे. दुसरीकडे, आता एक दुर्देवी घटना समोर येत आहे. कंगुवा चित्रपटाचे एडिटर निषाद यूसुफ (Nishad Yusuf Died) यांचे निधन झाले आहे.
कोच्चीच्या एका फ्लॅटमध्ये ३० ऑक्टोबर रोजी त्यांचा मृतदेह आढळून आला. वयाच्या ४३ व्या वर्षी निषाद यांच्या मृत्यूचे वृत्त समोर आल्याने साऊथ इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहे.
सूर्या स्टारर कंगुवा चित्रपट रिलीज होण्यासाठी काही दिवस बाकी आहेत. त्याआधी चित्रपट निर्मात्यांसाठी निषाद यूसुफ यांचे निधन धक्का देणारे वृत्त आहे. खरेतर, निषाद यांच्या मृत्यूची पुष्टी एम्पलाईन फेडरेशन ऑफ केरल (FEFKA) डायरेक्टर्स युनियन द्वारा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर देण्यात आली आहे.