.jpg?rect=0%2C0%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C0%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क - कंगना रानौत लोकसभा निवडणूक २०२४ जिंकल्यानंतर खूप चर्चेत आल्या. सध्या त्या आगामी चित्रपट इमरजन्सीच्या प्रमोशनमध्ये मग्न आहेत. दरम्यान, मिले ना मिले हम को स्टार एक्टर चिराग पासवान यांच्यासोबत व्हायरल फोटोंवर कंगना यांची प्रतिक्रिया आली आहे. दोघांची भेट संसदेत झाली होती. त्यानंतर दोघांचे फोटो सोशल मीडयावर व्हायरल झाले होते. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये हसत कंगना यांनी सांगितले की, कृपया आम्हाला संसदेत तरी एकटे सोडू नका. मी चिरागला खूप काळापासून ओळखते. ते चांगले मित्र आहेत आणि लोक त्यांच्या मागे पडले आहेत. कारण त्यांना काही वेळासाठी हसवलं होतं. आता ते मला पाहून सिंपल पद्धतीवे रस्ता बदलतात.
याआधी एका टीव्ही चॅनेलच्या खास कार्यक्रमात कंगनाचा मित्र आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवानने म्हटले की, कंगना माझी चांगली मैत्रीण असून दृढ निर्णय घेणारी महिला देखील आहे. त्यांनी कंगनाला आपली जुनी मैत्रीण असल्याचे सांगितले. ते म्हणाले, 'कंगनाचे स्वत:चे विचार आहे आणि ते उघडपणे मांडायला ती अजिबात घाबरत नाही. तिचे विचारांशी सहमत वा असहमत असू शकतं. पण आज ती राजकीय विश्वात आहे. पण यामध्ये ती दखल अंदाज करत नाही...'
कंगना रानौत -चिराग पासवान यांनी २०११ मध्ये रिलीज झालेला चित्रपट मिले ना मिले हममध्ये काम केलं होतं. हा चित्रपट तनवीर खानने दिग्दर्शित केला होता. पण हा चित्रपट म्हणावा तसा चालला नाही.