पुढारी ऑनलाईन डेस्क : मल्याळम चित्रपट इंडस्ट्रीवर लेखिका शोभा डे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. असं वाटतं की, सर्वांच्या मध्ये एक समझोता झाला आहे, इंडस्ट्रीत कुणीही एकमेकांना नुकसान नाही पोहोचवणार. जे चालत आहे, त्यावर लक्ष दिले जाणार नाही, असे त्या म्हणाल्या. शरीराचा सौदा नाही तर कामदेखील नाही, अशी स्थिती बनलीय. बॉलिवूडनेदेखील यावर मौन बाळगले आहे.
मल्याळम चित्रपट इंडस्ट्रीत सध्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणांवरून मोठी चर्चा आहे. जस्टिस हेमा कमिटीचा रिपोर्ट समोर आल्यानंतर अनेक महिला कलाकारांनी झालेल्या शोषणाबद्दल आवाज उठवला. #MeeToo प्रमाणे अनेक घटना समोर येत आहेत. त्यानंतर अनेक दिग्दर्शक आणि चित्रपट इंडस्ट्रीतील नावे समोर येत आहेत. लेखिका शोभा डे यांनी या प्रकरणी बॉलीवूडचे मौन आणि मल्याळम चित्रपट दिग्दर्शक मोहनलाल यांच्यावरही टीका केलीय.
लैंगिक शोषण प्रकरणात आतापर्यंत अनेक अभिनेते, निर्माते, दिग्दर्शकांची नावे समोर आली आहेत. मोहनलालने असोसिएशन ऑफ मल्याळम मुव्ही ॲक्टर्स (AMMA) च्या प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. लेखिका शोभा डे यांनी यासाठी मोहनलालला जबाबदार ठरवलं आहे. त्यांचे म्हणणे आहे की, मोहनलालने त्या पदावर असताना लोकांसाठी न्याय सुनिश्चित करण्याऐवजी पदाचा राजीनामा दिला. असोसिएशनच्या सर्व कार्यकारी समितीच्य सदस्यांनी राजीनामा दिला आहे. शोभा डे म्हणाल्या, उठा आणि माणूस बना, आपल्या टीमच्या अन्य सदस्यांना पीडितांची जबाबदारी घेणे आणि त्या लोकांची मदत करण्यासाठी सांगा.
शोभा डे यांनी एनडीटीव्हीशी बोलताना म्हटले की, या प्रकरणी दु:खाची गोष्ट हे आहे की, जवळपास ५ वर्षांपर्यंत जस्टिस हेमा कमिटीचा रिपोर्ट तसाच पडून होता. पण, काहीही केलं गेलं नाही. आपला रोजचा कामकाज आणि परिस्थितीने निराश मल्याळम चित्रपट इंडस्ट्रीच्या काही महिलांनी एक वेगळा ग्रुप सुरू केला. या महिला १५-२० पुरुषांद्वारा नियंत्रित एका ग्रुपमुळे चिंतेत होत्या. तो ग्रुप महिलांचे कामचं नव्हे तर वैयक्तिक जीवनावरही नियंत्रण ठेवत होते.
"२०१७ मध्ये किडनॅपिंग आणि बलात्काराचे प्रकरण समोर आले होते. आज मल्याळम चित्रपट इंडस्ट्रीविषयी लोकांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. मल्याळम चित्रपटासाठी हे नवीन नाही. हे खूप व्यापक आहे. हे बॉलीवूडमध्येदेखील होत आहे. बंगाली आणि कर्नाटक चित्रपट इंडस्ट्रीदेखील यातून सुटली नाही.
शोभा डे यांनी यामागील एक मोठे कारण सांगितले ते म्हणजे, "पितृसत्ताक व्यवस्था". चित्रपट इंडस्ट्रीवर कब्जा केला आहे. ज्याप्रकारे चित्रपट इंडस्ट्री काम करते, ते खूप घृणास्पद आहे, विषारी पितृसत्तात्मक व्यवस्था आहे. महिला पूर्णपणे आवाजहीन आणि शक्तीहीन वाटत आहेत. त्यासाठी या गोष्टी बदलणे खूप गरजेचे आहे. त्या म्हणाल्या, मी खूप निराश आहे, हैराण आहे की, हे सर्व होत आहे आणि मोहनलालच्या अध्यक्षतेखालील स्ट्रॉन्ग कार्यकारी समितीला सामूहिकपणे राजीनामा द्यावा लागला, यामुळे काय मदत मिळेल?
शोभा डे यांचे म्हणणे आहे की, चांगले नेतृत्व ते असतं, जिथे थांबून महिलांच्या विरोधात हिंसेच्या गुन्हेगारांच्या विरोधात कारवाई करतं. पण कहाणी त्याउलट आहे. महिलांकडे अनैतिक मागणी केली जात आहे. सेटवर टॉयलेटसारखी प्राथमिक सुविधा देखील दिली जात नाही. हे खूप अमानवीय, असंवेदनशील देखील आहे. या मुद्द्यावर बॉलीवूडमधून कोणत्याही मजबूत पुरुषाने आवाज उठवला नाही. ज्या अभिनेत्यांनी हे पाहिलं आहे, त्यांनीही काही सांगितलं नाही. महिला असो वा पुरुष, जेव्हादेखील बोलण्याची गरज असेल तर नक्कीच बोलायला हवं.