Kangana Ranaut Hollywood Debut | 'टर्न टू हॉलीवूड', सायकोलॉजिकल हॉररमध्ये कंगना रनौतचं पाऊल

Kangana Ranaut Bollywood to Hollywood | कंगना अनुराग रुद्र दिग्दर्शित ‘ब्लेस्ड बी द एविल’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारू शकते.
image of Kangana Ranaut
Kangana Ranaut Hollywood DebutInstagram
Published on
Updated on

Kangana Ranaut Hollywood Debut psychological thriller

मुंबई - बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत आता हॉलीवूडमध्ये जाण्यासाठी सज्ज आहे. ती अनुराग रुद्र दिग्दर्शित ‘ब्लेस्ड बी द एविल’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारू शकते. या चित्रपटात कंगना सोबत टीन वुल्फ, टायलर पोसी आणि हॉलीवूड आयकॉन सिल्वेस्टर स्टेलोनची मुलगी स्कारलेट रोज स्टेलोन असेल.

कधी सुरू होणार शूटिंग?

मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटाची निर्मिती उन्हाळ्यातच न्यू-यॉर्क शहरात सुरु होईल.

image of Kangana Ranaut
Anupam Kher | 'हम भारत में है! हमारी सुरक्षा सेना कर रही है...आप टेंशन मत लो'; जम्मूमधील अनुपम खेर यांच्या भावाची पोस्ट व्हायरल

‘ब्लेस्ड बी द एविल’ सायकोलॉजिकल हॉरर चित्रपट

या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग रुद्र यांनी केलं आहे. त्यांनी गाथा तिवारी लायन्स मुव्हिजचे अध्यक्ष आणि संस्थापकासोबत मिलून स्क्रिप्ट देखील लिहिली आहे. ‘ब्लेस्ड बी द एविल’ एक सायकोलॉजिकल हॉररपट आहे.

काय असेल चित्रपटाची कहाणी?

मीडिया रिपोर्टनुसार, एक ख्रिश्चन कपलवर केंद्रित आहे जे गर्भपाताच्या आघातामुळे संघर्ष करत आहे. एका नव्या शोधात, एक अंधार आणि भयावह इतिहास असणारे शेत खरेदी करतात. तिथे त्यांचा सामना एका दुष्ट शक्तीने होतो.

चित्रपटाचे दिग्दर्शन अनुरागने आपले अनुभव शेअर करताना म्हटले आहे - ''ग्रामीण भारतात जन्म आणि बालपण गेल्याने मला अशा कथा ऐकवल्या गेल्या, ज्या माझ्यात मनात राहून गेल्या. ही लोककथा इतकी खास होती की, मला वास्तवात सर्व कथांवर विश्वास होता. मी त्यांना सिनेमाच्या कलेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित करू इच्छितो.''

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news