

बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर यांनी जम्मूमध्ये राहत असलेल्या चुलत भावाची प्रतिक्रिया शेअर केली आहे. त्यांची सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत आहे.
India-Pakistan War Anupam Kher shared video tweet
मुंबई : ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकिस्तान यांच्यात तणावाची स्थिती आहे. पाकिस्तानने जम्मूला लागून असलेल्या भागांवर अनेक क्षेपणास्त्रे डागली, परंतु पाकिस्तानचे हे नापाक मनसुबे आपल्या भारतीय सैन्याने हाणून पाडले. दरम्यान, प्रत्येक भारतीय आपल्या लष्कराला समर्थन करत आहे. राजकीय नेता असो वा बॉलिवूड स्टार्स यांनी पोस्ट करून भारतीय जवानांवर अभिमान असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, अभिनेते अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केली आहे, जी खूप व्हायरल होत आहे.
अनुपम यांचा चुलत भाऊ सुनील खेर जम्मूमध्ये राहतात. त्यांनी अनुपम यांना एक व्हिडिओ पाठवून आपल्या जवानांच्या शौर्याची कहाणी सांगितली. अनुपम यांनी पोस्टमध्ये काय लिहिले पाहा -
अनुपम खेर यांनी आपल्या चुलत भावासोबत झालेली बातचीत सोशल मीडियावर शेअर केली आहे. सोबत भावाने जम्मूतून पाठवेला व्हिडिओ देखील शेअर केला आहे. त्यांच्या भावाने आकाशातील मिसाईल्सचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
अनुपम यांनी पुढे लिहिलंय- मी व्हिडिओ पाहिला आणि तत्काळ माझ्या चुलत भावाला कॉल करून विचारलं की तो आणि परिवार ठिक आहे ना? यावर भावाने सांगितले की, ''माझ्या भावा...आम्ही भारतात आहोत! आम्ही हिंदुस्तानी आहे. आमची सुरक्षा भारतीय लष्कर आणि माता वैष्णो देवी करत आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तसे तर कोणतेही मिसाईल आम्ही जमिनीवर पडू देत नाही” जय माता की! भारत माता की जय!''