Actor Kalyan Chatterjee Death | अभिनेते कल्याण चॅटर्जी काळाच्या पडद्याआड

Actor Kalyan Chatterjee Death | अभिनेते कल्याण चॅटर्जी काळाच्या पडद्याआड
image of Actor Kalyan Chatterjee
Actor Kalyan Chatterjee Deathx account
Published on
Updated on
Summary

दिग्गज बंगाली अभिनेता कल्याण चॅटर्जी यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. टायफॉईड व वृद्धापकाळाशी निगडित आजारांमुळे ते कोलकातातील MR Bangur रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांनी ४०० हून अधिक चित्रपटात भूमिका करून बंगाली तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची ठळक ओळख निर्माण केली.

Actor Kalyan Chatterjee passed away

दिग्गज अभिनेते कल्याण चॅटर्जी यांचे दीर्घकाळाने निधनझाले. चारशेहून अधिक चित्रपटांत काम केलेल आणि मागील सहा दशकाहून अधिक चित्रपटांवर राज करणारे अभिनेते कल्याण चॅटर्जी यांच्या निधनाची पुष्टी वेस्ट बंगाल मोशन पिक्चर आर्टिस्ट्स फोरमने केली आहे.

image of Actor Kalyan Chatterjee
Dhurandhar Box Office Collection | हिच असली क्रेझ! केवळ ३ दिवसांत वर्ल्डवाईड इतक्या कोटींचा गल्ला

कल्याण चॅटर्जी मागील काही काळापासून आजारी होते. त्यांना टॉयफॉईड झाला होता. वयोमानानुसार, होणाऱ्या आजारांशी ते लढत होते. काही दिवसांपासून ते एमआर बंगुर सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलमध्ये भरती होते. रविवारी रात्री वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

आर्टिस्ट फोरमने एक स्टेटमेट जारी करत लिहिले, "आमच्या सर्वात खास सदस्यांपैकी एक, कल्याण, आम्हाला सोडून गेले आहे. आम्हाला खूप धक्का बसला आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो."

image of Actor Kalyan Chatterjee
Kanika Kapoor | 'तो धावत आला, अचानक धरले पाय', कनिका कपूरच्या लाईव्ह परफॉर्मन्सवेळी अचानक घडला प्रकार (व्हिडिओ)

कल्याण यांचे करिअर

पुणे चित्रपट इन्स्टिट्यूटमधून शिक्षण घेणारे कल्याण यांनी बंगाली, हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी तब्बल ४०० चित्रपट केले. त्यांनी आपल्या करिअरमध्ये अधिकतर सहाय्यक भूमिका साकारल्या होत्या.

सत्यजीत रे सोबत काम

कल्याण चॅटर्जीने आपल्या करिअरची सुरुवात १९६८ मध्ये अपोंजन (Aponjan) मधून केली होती. धन्यी मेये, दुई पृथिबी, सबुज द्विपेर राजा, बैशे स्राबोन अशा मो्ठ्या चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला. ते दिग्गज निर्माते-दिग्दर्शक सत्यजीत रे (Satyajit Ray) यांच्या प्रतिद्वंदी चित्रपटाचा हिस्सा होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news