Kanika Kapoor | 'तो धावत आला, अचानक धरले पाय', कनिका कपूरच्या लाईव्ह परफॉर्मन्सवेळी अचानक घडला प्रकार (व्हिडिओ)

Kanika Kapoor | 'तो धावत आला..अचानक स्टेजवर धरले पाय', कनिका कपूरच्या परफॉर्मन्सवेळी अचानक घडला प्रकार
image of kanika kapoor
Kanika Kapoor live performance surprisingly incident on the stage Instagram
Published on
Updated on
Summary

कनिका कपूर यांच्या लाइव्ह परफॉर्मन्सदरम्यान एक व्यक्ती अचानक स्टेजवर धावत आला आणि तिच्या पायाला हात घातल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला. सुरक्षा रक्षकांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली. कनिकानेही प्रसंग शांतपणे हाताळला आणि शो पुन्हा सुरळीत पार पडला.

Kanika Kapoor live performance surprisingly incident on the stage

लाईव्ह परफॉर्मन्स वेळी धक्कादायक प्रकार घडणे, हे काही नवीन गोष्ट नाही. कधी कलाकारांवर बाटल्या तर कधी चप्पल बूट फेकले जातात. असाच प्रकार गायिका कनिका कपूरच्या कार्यक्रमावेळी घडला. अचानक घडलेल्या प्रकारानंतर कनिका अजिबात अस्वस्थ झाली नाही. तिने आपले गाणे सुरुच ठेवले. या प्रकारानंतर चाहते तिचे कौतुक करत आहे.

image of kanika kapoor
Dhurandhar Box Office Collection | हिच असली क्रेझ! केवळ ३ दिवसांत वर्ल्डवाईड इतक्या कोटींचा गल्ला

नेमकं काय घडलं?

काल रात्री मेगॉन्ग फेस्टिव्हलमध्ये कनिका कपूरच्या लाईव्ह परफॉर्मवेळी एक तरुण अचानक स्टेजवर धावत आला. त्याने कनिकाचे पाय धरले. क्षणभरात असे वाटले की, तो कनिकाला उचलण्याचा प्रयत्न करत होता. पण परिस्थिती सावरली. सुरक्षारक्षक धावत आले आणि त्याला स्टेजवरून दूर नेले. दरम्यान, पण कनिका एका सेकंदासाठीही थांबली नाही. तिने आपले गाणे सुरु ठेवून कार्यक्रम सुरळीत मार्गी लावला.

या कार्यक्रमादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. तिच्या या निर्णयानंतर तिचे कौतुक होताना दिसते.

image of kanika kapoor
Ranbir Kapoor-Alia Bhatt | तब्बल २५० कोटींच्या बंगल्यात आलिया-रणबीरचा गृहप्रवेश, राहाचे बर्थडे फोटोही व्हायरल

कनिका कपूर विषयी -

'बेबी डॉल', 'लव लेटर' यासारख्या गाण्यांनी तिने लाखो संगीतप्रेमांच्या मनावर राज्य केले आहे. तिचा आवाजच नाही तर स्टाईल देखील कमालीचा आहे. ती ४७ वर्षांची असून तिला तीन मुले आहेत. तिचा इतका जबरदस्त फिटनेस आहे की, तिला पाहून कुणालाही विश्वास बसणार नाही की, तिला तीन मुले आहेत. वयाच्या १८ व्या वर्षी तिने लग्न केले होते. ती परदेशात राहत होती. पण गाण्यांसाठी ती भारतात आली.

(video-viralbhayani insta वरुन साभार)

स्टाईल असो वा गाणी नेहमीच कनिका कपूरवर सर्वांच्या नजरा खि‍ळल्या आहेत. कनिकाने काही महिन्यापूर्वी पॅरिस फॅशन वीकमध्ये परफॉर्म केला होता. यावेळी तिच्या छोट्या स्कर्टमधील अदांवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. कनिका कपूरचा जन्म लखनऊमध्ये झाला होता. तिने २०१२ मध्ये संगीताच्या विश्वातील आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मुंबईत पाऊल ठेवले होते.

जगभरात 'महाकुंभ'चा आवाज

कनिका कपूरच्या 'साऊंड्स ऑफ कुंभ'साठी ६८ वा ग्रॅमी ॲवॉर्ड्समध्ये बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बमचे नॉमिनेशन मिळाले आहे. गाण्याची निर्मिती सिद्धांत भाटिया यांनी केली आहे. ‘साऊंड्स ऑफ कुंभ’साठी बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम कॅटेगरीमध्ये ६८ व्या ग्रॅमी ॲवॉर्ड्समध्ये नॉमिनेशन मिळाले आहे. हा प्रोजेक्ट महाकुंभमेळ्याच्या अवतीभोवती फिरतो. कनिकाने कपूरने मुख्य ट्रॅकसाठी आपला आवाज दिला आहे. जगभरातील ५० हून अधिक संगीतकारांनी मिळून हा प्रोजेक्ट यशस्वी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news