Kalki Koechlin : कल्की ठरलेली बाललैंगिक शोषणाची शिकार

Kalki Koechlin : कल्की ठरलेली बाललैंगिक शोषणाची शिकार
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : अभिनेत्री कल्की कोचलीन ( Kalki Koechlin ) आज ( १० जानेवारी ) आपला ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. राष्ट्रीय पारितोषिक जिंकणारी कल्कीला प्रगल्भ आणि प्रभिवान अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये ओळखले जाते. अनेक चित्रपटात तिने लक्षवेधून घेणारे काम केले आहे. अशा या गुणी अभिनेत्रीला देखिल खूपच वाईट प्रसंगाला बळी पडावे लागले आहे. अगदी बाल वयातच ती लैगिंक अत्याचाराची शिकार ठरली होती.

मूळचे फ्रान्सचे असणारे कल्कीचे ( Kalki Koechlin ) आई-वडील भारतात पाँडेचरीला येऊन स्थायिक झाले. कल्कीचे वडील इंजिनिअर आहेत. पुढे त्यांनी तामिळनाडूतील उटीजवळ ग्लायडर्स आणि कमी वजनाचे विमान बनविण्याचा व्यवसाय सुरु केला. खूपच कमी लोकांना माहित आहे की, कल्कीचे आजोबा देखिल इंजिनिअर होते तसेच त्यांनी जगप्रसिद्ध आयफेल टॉवर बनविण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. कल्कीचे शिक्षण उटीच्या हरब्रॉन शाळेत झाले. शालेय शिक्षण पार पडल्यावर तिने अभिनय आणि नाट्य शिक्षण घेण्यासाठी ती लंडनला गेली. तिने लंडनच्या विद्यापीठातून अभिनायचे धडे घेतले.

कल्की कोचलीनने 'देव डी' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिच्या विदेशी दिसण्यामुळे दिग्दर्शक अनुराग कश्यप तिला या चित्रपटात घेणार होता. पण ऑडिशनमध्ये तिचा अभिनय पाहून तिला चंद्रमुखी नावाची मुख्य भूमिकेसाठी निवड करण्यात आली. या चित्रपटासाठी तिने फिल्मफेअर पारितोषिक पटकावले. या नंतर तिने 'दॅट गर्ल इन यलो बुटस्', 'शैतान', 'जिंदगी ना मिलेगी दोबारा', 'शांघाई', 'एक थी डायन', ' ये जवानी है दिवानी', मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ', 'वेटिंग', 'अ डेथ इन द गेज', 'रिबन', 'गली बॉय' अशा सारखे अनेक चित्रपटात तिने अभिनय केला आहे. 'मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ' या चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

बालपणी झाले लैगिंक शोषण ( Kalki Koechlin )

आपल्या बेधकड आणि मोकळ्या ढाकळ्या स्वभावासाठी कल्की प्रसिद्ध आहे. एका मुलाखती दरम्यान तिने सांगितले की, वयाच्या ९ व्या वर्षी तिच्यावर लैगिंक अत्याचार झाला होता. पण, या गोष्टीची कल्पना तिने त्यावेळी आपल्या पालकांना दिली नाही. ती १५ वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला आणि त्यानंतर तिच्या वडिलांनी दुसरा विवाह केला. पुढे कल्की तिच्या आई सोबत राहू लागली.

लग्न न करताच बनली आई ( Kalki Koechlin )

'देव डी' या चित्रपटाच्या शूटींग दरम्यान कल्की आणि अनुराग कश्यप एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर २०११ साली त्यांनी विवाह केला. पण, त्यांचे वैवाहिक जीवन फार काळ टिकले नाही. दोन वर्षांनी त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. यानंतर मूळच्या इस्त्राइलचा असणारा पेंटर हर्शबर्ग सोबत रिलेशन मध्ये आली. ते लिव्ह इन मध्ये राहू लागले. नंतर २०२० मध्ये तिने लग्न न करताच गोंडस मुलीस जन्म दिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kalki (@kalkikanmani)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news