Bollywood 2022 : या वर्षात ७ देशभक्तीपर चित्रपट होणार प्रदर्शित

Bollywood 2022 : या वर्षात ७ देशभक्तीपर चित्रपट होणार प्रदर्शित
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन

गतवर्षाच्या उत्तरार्धात सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांचा 'शेरशाह' या चित्रपटाला ओटीटीवर मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता या वर्षात ( Bollywood 2022 ) सैनिकांवर तसेच देशभक्तीपर कथानक असलेले एकूण ७ चित्रपट प्रदर्शित होत आहेत. देशाच्या संरक्षण दलांची यशोगाथा यातून समोर येणार आहे.

अटॅक Attack ( Bollywood 2022 )

लक्ष्य राज आनंद दिग्दर्शित हा चित्रपट एक अ‍ॅक्शन थ्रिलर आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम, रकुल प्रीत सिंग आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्या भूमिका आहेत. चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. जॉन यात एका कमांडोच्या भूमिकेत आहेत. जो थोडाफार सायबोर्गसारखा आहे. म्हणजे ज्यात मशिन आणि व्यक्तीचे मिश्रण आहे. हा चित्रपट 28 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता. पण, रिलीज डेट पुढेही जाऊ शकते.

मेजर Major ( Bollywood 2022 )

अभिनेता आदीवी सेष याचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर संदीप उन्नीकृष्णन यांची कहाणी असणार आहे. चित्रपटात शोभिता धुलिपाला, सई मांजरेकर, प्रकाशराज यांच्याही भूमिका आहेत. 11 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

सॅम बहादुर Sam Bahadur ( Bollywood 2022 )

मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटात विकी कौशल फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या भूमिकेत दिसणार आहे. माणेकशॉ यांचा हा बायोपिक आहे. सान्या मल्होत्रा यात माणेकशॉ यांच्या पत्नीच्या भूमिकेत तर फातिमान सना शेख इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेट निश्चित्त नसली तरी नोव्हेंबर-डिसेंबर या काळात तो रिलीज होऊ शकतो.

तेजस Tejas

कंगना राणावतची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट भारतीय हवाईदलातील पायलट तेजस गिल यांच्यावर आधारीत आहे. 22 ऑक्टोबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

गोरखा Gurkha

अभिनेता अक्षयकुमारचे वर्षभरात तीन ते चार चित्रपट रिलीज होतच असतात. त्यात या वर्षी 'गोरखा'चीही भर पडेल. भारतीय सैन्यतील प्रतिष्ठित गोरखा रेजिमेंटचे युद्धनायक मेजर जनरल इयान कार्डोजो यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारीत आहे. संजय पूरन सिंह चौहान यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

पिप्पा Pippa

ब्रिगेडियर बलराम सिंह मेहता यांनी लिहिलेल्या '1971 ः अ नेशन कम्स ऑफ एज' वर आधारित या चित्रपटात अभिनेता ईशान खट्टर मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचे 'पिप्पा' हे शीर्षक पीटी-76 या रणगाड्यावरून ठेवले आहे. रणगाडा 'पिप्पा' म्हणून प्रसिद्ध आहे. चित्रपटात मृणाल ठाकूर, प्रियांशु पेन्युली, सोनी राजदान यांच्याही भूमिका आहेत.

इक्कीस Ekkis

सेकंड लेफ्टनंट अरूण खेत्रपाल यांच्यावर आधारीत कहाणी असलेल्या या चित्रपटात वरूण धवन मुख्य भूमिकेत आहे. वरूण यासााठी दोन वर्षांपासून तयारी करत आहे. 21 वर्षांचे असताना खेत्रपाल यांनी पाकिस्तानी सैन्याच्या भयंकर आणि अथक हल्ल्यांचा यशस्वी सामना करत शौय दाखवले होते. त्यांना मरणोपरांत परमवीचक्र या किताबाने सन्मानितही करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news