

Anjali Arora In Thailand
मुंबई - 'कच्चा बादाम' गाण्यामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अंजली अरोराचा नवा डान्स व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये अंजली अरोरा पटायातील एका क्लबमध्ये डान्स करताना दिसतेय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.
कंगना रनौतचा धमाकेदार शो 'लॉकअप'मधून तिने आपली ओळख बनवली होती. त्याआधी ती कच्चा बादाम गाण्यावरील डान्समुळे प्रसिद्ध झाली होती. आता ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलीय. अंजलीच्या एका व्हायरल व्हिडिओमुळे नेटकऱ्यांनी एक्स अकाऊंटवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडिओमध्ये दिसते की, थायलंडमधील पटायातील एका बारमध्ये ती ठुमके लगावतेय. खूप सारी गर्दी तिच्या अवतीभोवती दिसतेय.
एक युजरने म्हटलं की, "मला समजत नाहीये की, अंजली अरोराचे प्रमोशन झाले आहे की डिमोशन. अंजली आधी रील्समध्ये डान्स करत होती..आता ती बारमध्ये डान्स करतेय.'' आणखी एकाने लिहिलंय- "अंजलीला अशी काय वेळ आली होती की, थेट बारमध्ये डान्स केला." आणखी एकाने म्हटलं, "माझे विचार सांगतात की, कोणताही बार असो देशातील वा परदेशातील, कुठल्याही मुलीने बारमध्ये डान्स करू नये. कारण त्यांची सामाजिक प्रतिष्ठा खराब होते. काम नाही तर कोणतेही अन्य कार्यक्रमांसाठी काम करा, भले पैसे कमी मिळू देत."
अंजली एक सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर, मॉडल आहे. ती आपल्या डान्स आणि लिप सिंकमुळे चर्चेत आली होती. 'कच्चा बादाम' गाण्यावरील तिचा डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. ती रिॲलिटी शो लॉक अपमध्येही दिसली होती.
video - Jatin Kumar Rathore x account