

Ek Deewane Ki Deewaniyat teaser out now
मुंबई - नव्या वर्षात हर्षवर्धन राणे पुन्हा प्रेमात वेडेपमा करणार आहे. अभिनेत्री सोनम बाजवासोबत तो एक दिवाने की दिवानीयत या चित्रपटात तो येणार आहे. आता या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. हर्षवर्धन राणे आणि सोनमच्या या चित्रपटाचा फर्स्ट लूक जारी करण्यात आलाय. त्यामध्ये दोघे कलाकार दिसत असून बॅकग्राऊंडला फायर हार्ट इमेज वापरण्यात आलीय. सोबतच चित्रपटाची रिलीज तारीख देखील समोर आलीय. पहिल्यांदाच हर्षवर्धन आणि सोनम एकत्र स्क्रिन शेअर करतील.
सोशल मीडियावर हर्षवर्धन राणेने चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. ज्यामध्ये हर्षवर्धन-सोनम बाजवा गंभीर लूकमध्ये दिसत आहे. पोस्टरमध्ये सोनम बाजवा रागात दिसते तर हर्षवर्धनच्या डोळ्यातून अश्रू निघत आहेत. हर्षवर्धनने पोस्टर कॅप्शमध्ये लिहिलंय- ''इस दीवाली दीये नहीं, दिल भी जलेंगे। मोहब्बत से टकराएगी नफरत, आग लगाएगी दीवानों की दिवानियत “#एक दीवाने की दीवानियत टीजर आउट होगा कल।''
निर्मात्यांनी चित्रपटाच्या रिलीज डेटचा खुलासा केला आहे. एक दीवाने की दीवानियत यावर्षी दिवाळीला २१ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात रिलीज होईल. या रोमँटिक चित्रपटाचा टीजर आज २२ ऑगस्ट रोजी रिलीज केला जाईल.
अंशुल गर्ग यांची निर्मिती असलेला हा एक रोमँटिक थ्रिलर आहे. कहणी मुश्ताक शेख, मिलन जवेरी यांचे दिग्दर्शन, सह-लेखन आहे. हा अंशुल गर्गचा पहिला फीचर चित्रपट आहे.
सोनम बाजवा अखेरीस ‘हाउसफुल ५’ मध्ये दिसली होती. ती टायगर श्रॉफच्या ‘बागी ४’ मध्येही दिसणार आहे.