

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिवंगत पंजाबी रॅपर सिद्धू मुसेवालाच्या पालकांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाचा शुभदीप सिंग सिद्धूचा पहिला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो पाहिल्यानंतर सिद्धूचे चाहते शुभदीपला हुबेहुब कॉपी असल्याचे म्हणत आहेत. तर ज्युनियर मुसेवाला अशी देखील कॉमेंट्स करत आहेत. तर काहींनी ज्युनियर मुसेवालाचा फोटो पाहिल्यानंतर त्याला सिद्धू मुसेवालाची कार्बन कॉपी म्हणत आहेत. (Sidhu Moose Wala Brother)
सिद्धू मूसवालाचे आई-वडील बलकौर सिंग आणि चरण कौर यांना याच वर्षी १७ मार्चमध्ये मुलगा झाला. आता त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या बाळाचा पहिला फोटो शेअर केला आहे. सिद्धू मुसेवालाच्या आई-वडिलांसाठी हे खास क्षण आहेत. बलकौर सिंग आणि चरण कौर यांच्यासाठी हा भावनिक क्षण आहे. शुभदीप सध्या आठ महिन्यांचा आहे. (Sidhu Moose Wala Brother)
मुसेवालाचे वडील बलकौर सिंग आणि आई चरण कौर यांनी आयव्हीएफच्या मदतीने पुन्हा पालक बनण्याचा निर्णय घेतला आणि त्यात ते यशस्वी झाले. आता त्यांनी या फोटोसोबत एक अतिशय भावनिक पोस्टही शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, 'त्या डोळ्यांमध्ये एक गर्द गोष्टी आहेत जी आपल्या आयुष्यातील प्रत्येक सत्य समजून घेते. चेहऱ्यावरचा निरागसपणा आणि शब्दांच्या पलीकडे एक अनमोल चमक आहे, जी आपल्याला नेहमी जाणवते की, जो चेहरा आपण कधीकाळी अश्रूंच्या डोळ्यांनी देवाच्या स्वाधीन केला होता, तो चेहरा आता देवाच्या कृपेने आणि सर्व बंधू-भगिनींच्या प्रार्थनांनी आशीर्वादित झाला आहे. एका छोट्या स्वरूपात आमच्याकडे परत आला आहे. वाहेगुरुंनी आपल्यावर केलेल्या अपार कृपेबद्दल आम्ही त्यांचे सदैव ऋणी राहू.'