

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध टीव्ही अभिनेता नितीन चौहानचे काल गुरुवारी मुंबईत निधन झाले. तो ३५ वर्षांचा होता. नितीनने अनेक टीव्ही शोजमध्ये उत्तम अभिनय केला होता. नितीनच्या अचानक जाण्याने टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. सूत्रांनुसार, त्याच्या एका सह-कलाकाराने नितीनने आपले जीवन संपवल्याची माहिती दिलीय.
प्रसिद्ध टीव्ही अभिनेता नितिन चौहान आज आपल्यामध्ये नाही. ‘क्राईम पेट्रोल’मधून त्याला लोकप्रियता मिळाली होती. रिॲलिटी शो दादागिरी-२ चा तो विजेता ठरला होता. नितीन उत्तर प्रदेशातील अलीगढ जिल्ह्याचा रहिवासी होता. शिवाय स्पिलट्सविला सीझन-५ शो देखील त्याने जिंकले होते.
अभिनेता नितीनने ‘जिंदगी डॉट कॉम’, ‘क्राईम पेट्रोल’ आणि ‘फ्रेंड्स’ यासारख्या टीव्ही शोमध्ये काम केलं होतं. नितीनला शेवटचं २०२२ मध्ये सब टीव्हीचा शो 'तेरा यार हूं मैं' मध्ये पाहण्यात आलं होतं.