

Jr. NTR - Hrithik Roshan competition war 2
मुंबई - ऋतिक रोशन आणि एनटीआर यांच्यातील सामना आता आणखी तीव्र झालाय. एनटीआर आणि ऋतिक रोशनचा आगामी चित्रपट 'वॉर २' हा १४ ऑगस्ट, २०२५ रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटाआधी मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या रिलीज आधी दोन्ही अभिनेत्यांमध्ये एक मजेशीर आणि जोरदार 'वॉर' सुरू झाला आहे. फॅन्ससाठी हे एक सरप्राईज आहे.
वॉर २ या बहुप्रतीक्षित चित्रपटातील आमने सामना फक्त मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार होता. पण, आता एक धाडसी आणि मजेशीर पाऊल उचलत, एनटीआरने थेट ऋतिक रोशनच्या घराबाहेर एक भव्य जाहिरात फलक (बिलबोर्ड) लावलाय. त्यावर लिहिले होते: "घुंगरू तुटतील पण आमच्याशी ही वॉर जिंकू शकणार नाहीस! #NTRvsHrithik"
ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय. चित्रपटाच्या प्रदर्शनाला अवघे ९ दिवस उरले आहेत.
ऋतिक रोशनने पोस्टमध्ये काय म्हटलं?
ऋतिकने या जाहिरात फलकाचा फोटो शेअर करत जबरदस्त उत्तर दिलंय. त्याने लिहिलं: "ठीक आहे @jrntr, आता तर तुम्ही खरंच अति केलं — माझ्या घरासमोर फलक लावून! ठीक आहे, आव्हान स्वीकारले. लक्षात ठेवा, हे सगळं तुमच्यामुळेच सुरू झालंय. #9DaysToWar2"
वॉर २ चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी यांनी केले आहे. निर्माता आदित्य चोप्रा आहेत.या चित्रपटात ऋतिक रोशन, एनटीआर आणि कियारा अडवाणी प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये जगभरातील चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित होणार आहे.