War 2 vs Coolie Box Office Collection | 'कुली'ची कासव गती तर 'वॉर-२'चा संघर्ष; काय म्हणताहेत बॉक्स ऑफिस आकडे

War 2 vs Coolie Box Office Collection | नुकसान पाहता नागा वामसीला वायआरएफ २२ लाख रुपये देणार?
image of Coolie - War 2 film poster
Coolie and War 2 Box Office Collection Instagram
Published on
Updated on

Coolie and War 2 Box Office Collection updates

मुंबई - रजनीकांत आणि ऋतिक रोशन-ज्युनियर एनटीआर यांच्या अनुक्रमे 'कुली' आणि 'वॉर २' या चित्रपटांना १४ ऑगस्ट रोजी एक आठवडा पूर्ण झाला. दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर २०० कोटींचा टप्पा ओलांडलाय. चित्रपटांचे प्रचंड बजेट असले तरी दोन्ही चित्रपटांना अपेक्षित कमाई करण्यासाठी संघर्ष करावा लागतोय.

वॉर-२ बॉक्स ऑफिस कलेक्शन

अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटाचे बजेट कुलीपेक्षा जास्त ४०० कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. चित्रपटात ऋतिक रोशन- ज्युनिअर एनटीआर यांच्याशिवाय कियारा आडवाणी, टायगर श्रॉफ, आशुतोष राणा हे कलाकार आहेत. 'वॉर २' ने ओपनिंग डेला ५२ कोटी रुपये कमावून खाते उघडले होते.

पहिल्या आठवड्याच्या शेवटी, वॉर २ च्या देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर २०४.२५ कोटींचा गल्ला जमवला आहे.

image of Coolie - War 2 film poster
Akshaye Khanna | मी धीरूबाई अंबानी, शाहरुख खान होत नाही तोवर यशस्वी नाही असं म्हणायचं का?: अक्षय खन्ना

कुली बॉक्स ऑफिस कलेक्शन

रजनीकांत यांचा आतापर्यंतचा सर्वाधिक ओपनिंग चित्रपट असलेल्या कुलीने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर २२९.७५ कोटी रुपयांची कमाई केलीय. 'कुली'ने ओपनिंग डेला ६५ कोटी रुपये कमावले आहेत. रिपोर्ट्सनुसार कुलीचे बजेच तब्बल ३५० कोटी रुपये आहे. तर रजनीकांत यांनी या चित्रपटासाठी २०० कोटी रुपये फी घेतलीय. चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनगराज यांनी केले आहे. चित्रपटात रजनीकांत यांच्या शिवाय, नागार्जुन, श्रुती हासन आणि आमिर खान यांच्या भूमिका आहेत.

image of Coolie - War 2 film poster
Comedian Jaswinder Bhalla | प्रसिद्ध कॉमेडियन जसविंदर भल्ला काळाच्या पडद्याआड

या वर्षी विकी कौशलच्या छावा नंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक हिंदी ओपनिंग चित्रपट 'वॉर २' ठरला होता. वॉर २ ने हिंदीमध्ये पहिल्या दिवशी २९ कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी (स्वातंत्र्यदिनी) हा आकडा ४४ कोटी रुपयांपर्यंत वाढला आणि नंतर गेल्या काही दिवसांत त्यात मोठी घसरण झाली.

वॉर २ चा नुकसान पाहता तेलुगु डिस्ट्रीब्युटर नागा वामसीला वायआरएफ २२ लाख रुपये देणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news