Akshaye Khanna | मी धीरूबाई अंबानी, शाहरुख खान होत नाही तोवर यशस्वी नाही असं म्हणायचं का?: अक्षय खन्ना

Akshaye Khanna | मी धीरूबाई अंबानी, शाहरुख खान होत नाही तोवर यशस्वी नाही असं म्हणायचं का?: अक्षय खन्ना
image of Akshaye Khanna
Akshaye Khanna success statement viral interview (File Photo)
Published on
Updated on

Akshaye Khanna success old statement viral interview

मुंबई - 'छावा' चित्रपटातील औरंगजेबाची भूमिका अभिनेता अक्षय खन्नाने साकारली होती. त्याच्या भूमिकेचे भरभरूनही कौतुक देखील झाले होते. अनेक चित्रपटांतून विविध प्रकारच्या हिट भूमिका करूनही तो एक सुपरस्टार बनला नाही, या गोष्टीची त्याला कुठलीही खंत नाही. एकदा त्याला विचारण्यात आले होते की, दमदार चित्रपट दिल्यानंतरही तो का सुपरस्टार बनला नाही? तेव्हा त्याने टाटा-अंबानी-शाहरुख खान यांचे उत्तम उदाहरण दिले होते.

शानदार चित्रपट तरीही सुपरस्टार का बनला नाही अक्षय?

अक्षयला एका जुन्या मुलाखतीत एक प्रश्न विचारण्यात आला होता की, 'बॉर्डर', 'दिल चाहता है', 'ताल' यासारख्या शानदार चित्रपटांमध्ये काम करूनही तो सुपरस्टारस्टार का बनला नाही? यावर अक्षय म्हणाला होता- ''जेव्हा देखील मला हा प्रश्न विचारला जातो, मी नेहमी विचार करतो की, समजा मी बिझनेसमॅन आहे आणि माझा एक ५०० कोटींचा बिझनेस आहे." यश नेहमी अवास्तव बेंचमार्कवर का मोजले जाते? जोपर्यंत मी रतन टाटा बनत नाही वा धीरूभाई अंबानी बनत नाही किंवा अझीम प्रेमजी बनत नाही, तोवर मी यशस्वी व्यक्ती होत नाही का?"

image of Akshaye Khanna
Aryan Khan | मी भाषण तोंडपाठ करून आलोय; शाहरुखच्या मुलाचा ट्रेलर लॉन्चचा व्हिडिओ व्हायरल

तो म्हणाला- ''अभिनेत्याला त्याचे चित्रपटच सुपरस्टार बनवतात. तुम्ही तेव्हा सुपरस्टार बनता, जेव्हा तुम्हाला 'गदर', 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे', 'हम आपके हैं कौन' यासारखे चित्रपट मिळतात. बस केवळ तुम्ही प्रयत्न करू शकता. याशिवाय अधिक काही करू शकत नाही. जर तुमच्या भाग्यात असे चित्रपट असतील तर तुम्ही सुपरस्टार बनू शकता.''

'जोपर्यंत मी धीरूबाई अंबानी शाहरुख खान बनत नाही, तर काय मी एक यशस्वी अभिनेता नाही?' अभिनेता अक्षय खन्नाने अनेकांना पडलेल्या प्रश्नावर हा सवाल उपस्थित केला. आपल्याकडे जे काही आहे, त्यात आपण समाधान कसे आहोत, हे देखील त्याने सांगितले.

image of Akshaye Khanna
Krushna Abhishek-Kiku Sharda | कृष्णा अभिषेक आणि किकू शारदा यांच्यात तू तू मैं मैं; व्हिडिओ व्हायरल

अभिनेता अक्षय खन्ना आपल्या सूक्ष्म अभिनयासाठी जातो. त्याने एकदा आपल्या यशाबद्दल विचार करायला लावणारा दृष्टीकोण शेअर केला होता, जो बॉलीवूडच्या पलीकडे जाऊन विचार करायला लावणारा होता.

परमेश्वराने मला काय दिलं नाही : अक्षय खन्ना

सुपरस्टार न बनल्याची खंत आहे का? यावर तो म्हणाला, ''नाही, कधीच नाही. परमेश्वराने मला काय दिलं नाही. १२० कोटींच्या लोकसंख्येत १५ ते २० लोकांनाच चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून काम करण्याची संधी मिळते.''

यशाबद्दल काय म्हणतात समुपदेशक मानसशास्त्रज्ज्ञ?

समुपदेशक मानसशास्त्रज्ज्ञ सृष्टी वत्स यशाबद्दल म्हणतात की, 'यश ही अभिमानाची गोष्ट आहे, परंतु जेव्हा ती अहंकारात बदलते तेव्हा ती नातेसंबंधांना आणि वैयक्तिक विकासाला हानी पोहोचवू शकते. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की कोणीही पूर्णपणे एकटे यश मिळवू शकत नाही. इतरांचा सन्मान करणे आणि दयाळूपणा दाखवणे यशाकडे जाणारा एक निरोगी दृष्टिकोण निर्माण करतो.'

त्या पुढे म्हणतात - 'नम्रता म्हणजे यश नाकारणे नाही. कुठलाही गर्व नसणे, आत्म-जागरूकता स्वीकारणे आणि आत्म-विकासाचे मूल्य ओळखणे म्हणजे माणसाचे जमिनीवर पाय असणे.'

अक्षयचे शब्ददेखील एक दुर्मीळ नम्रता प्रतिबिंबित करतात. कोणाच्याही सोबत तुलना न करता आत्मसंतुष्ट राहणे, हेच समाधान आणि यशाचे गमक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news