Jim Carrey Third wedding : हॉलिवूडचा 'कॉमेडी किंग' जिम कॅरीने गुपचूप उरकलं तिसरं लग्न!

दीर्घकाळाच्या मैत्रिणीबरोबर असलेल्‍या नात्‍याची जिम कॅरी यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती कबुली
Jim Carrey Third wedding
हॉलिवूडचा 'कॉमेडी किंग' अशी ओळख असणारा अभिनेता जिम कॅरीने त्याची दीर्घकाळापासूनची मैत्रीण 'मिन आ' हिच्याशी खासगी समारंभात लग्नगाठ बांधली. Pudhari
Published on: 
Updated on: 

Jim Carrey Third wedding : हॉलिवूडचा 'कॉमेडी किंग' अशी ओळख असणारा अभिनेता जिम कॅरीने त्याची दीर्घकाळापासूनची मैत्रीण 'मिन आ' हिच्याशी खासगी समारंभात लग्नगाठ बांधली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा रंगली होती. अखेर बुधवारी त्यांच्या प्रतिनिधीने 'पीपल' मासिकाशी बोलताना या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला.'टीएमझेड'ने दिलेल्या वृत्तानुसार, लॉस एंजेलिसमध्ये मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. ६४ वर्षांच्या जिम कॅरीने आपले हे नाते प्रसारमाध्यमांच्या आणि प्रसिद्धीच्या झोतापासून नेहमीच दूर ठेवले होते.

जिम कॅरी यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती नात्‍याची कबुली

लग्नाच्या काही महिने आधीच जिम कॅरी यांनी 'मिन आ' सोबतच्या आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली होती. फ्रान्समधील एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान पुरस्कार स्वीकारताना त्यांनी आपल्या कुटुंबाचे आभार मानले. या भाषणात त्यांनी 'मिन'चा उल्लेख आपली "अत्यंत उत्कृष्ट जोडीदार" असा केला होता. "माझे अद्भुत कुटुंब, माझी मुलगी जेन आणि माझा नातू जॅक्सन यांचे मनापासून आभार. माझे तुमच्यावर नेहमीच प्रेम राहील. तसेच माझी उत्कृष्ट जोडीदार 'मिन आ', तुझेही खूप खूप आभार."

Jim Carrey Third wedding
Vijay Sethupathi Maharaja Remake: विजयच्या 'महाराजा' चित्रपटाने इतिहास रचला; हॉलीवूडमध्ये रिमेक होणारा ठरला पहिला तमिळ चित्रपट

दोघांनीही खासगी आयुष्य ठेवले प्रसिद्धीच्या झोतापासून दूर

रिपोर्टनुसार, जिम कॅरी आणि मिन आ हे गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये 'जस्ट जारेड'ने या दोघांचे काही फोटो प्रसिद्ध केले होते. लॉस एंजेलिसमधील 'लार्गो' येथे जड अपाटो यांनी आयोजित केलेल्या एका 'चॅरिटी कॉमेडी शो'मधून बाहेर पडतानाचे हे फोटो होते. अशा मोजक्या प्रसंगी सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसण्याव्यतिरिक्त, या दोघांनीही आपले खाजगी आयुष्य नेहमीच प्रसिद्धीच्या झोतापासून दूर ठेवले आहे.

Jim Carrey Third wedding
प्रेमाला वय नाही! ५९ व्या वर्षी हॅली बेरी म्हणाली ‘होकार’; सिंगर वॅन हंटशी लग्न कधी?

जिम कॅरी यांचा तिसरा विवाह

जिम कॅरी यांचा पहिला विवाह १९८७ मध्‍ये मेलिसा वोमर यांच्याशी झाला होता. पहिल्या लग्नापासून त्यांना जेन ही मुलगी आहे. यानंतर १९९६ ते १९९७ या काळात अभिनेत्री लॉरेन हॉली यांच्याशी लग्न झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news