प्रेमाला वय नाही! ५९ व्या वर्षी हॅली बेरी म्हणाली ‘होकार’; सिंगर वॅन हंटशी लग्न कधी?

हॉलीवूडची क्वीन ऑफ लव्ह! हॅली बेरी चौथ्यांदा बांधणार लग्नगाठ; ५९ व्या वर्षी सिंगर वॅन हंटचा धरणार हात!
Hollywood Actress Halle Berry Engagement
प्रेमाला वय नाही! ५९ व्या वर्षी हॅली बेरी म्हणाली ‘होकार’; सिंगर वॅन हंटशी लग्न कधी?file photo
Published on
Updated on

Halle Berry Confirmed Her Engagement: halle berry hollywood actress confirmed her engaged to musician van hunt want to married

पुढारी ऑनलाईन :

हॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री हॅली बेरी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. नुकत्याच एका मुलाखतीत तिने तिच्या साखरपुड्याची अधिकृतपणे कबुली दिली आहे. हॅली बेरी नेमकी कधी लग्न करणार, याबाबत जाणून घ्या.

Hollywood Actress Halle Berry Engagement
पनीर घोटाळा... घरी बनवा ही हाय-प्रोटीन डिश, बोट चाटून पुसून खाल

हॉलीवूड अभिनेत्री हॅली बेरी गेल्या अनेक काळापासून सिंगर आणि गीतकार वॅन हंटला डेट करत आहे. अलीकडेच एका टीव्ही शोमध्ये हॅलीने तिच्या साखरपुड्याची बातमी मान्य केली. तसेच वॅन हंटसोबत ती कधी लग्न करणार, याबद्दलही तिने माहिती दिली.

हॅली आणि वॅन हंट यांचे लग्न कधी होणार?

‘द टुनाइट शो स्टारिंग जिमी फॉलन’मध्ये बोलताना हॅली बेरीने सांगितले की, ती वॅन हंटसोबत नक्कीच लग्न करणार आहे. मात्र लग्नाची तारीख अद्याप ठरलेली नाही. पुढे बोलताना हॅली म्हणाली, “जेव्हा वॅनने मला लग्नासाठी विचारले, तेव्हा मी होकार दिला. मात्र सध्या आमच्याकडे लग्नाच्या तारखेबाबत कोणतीही माहिती नाही. पण मी त्याच्याशी नक्की लग्न करणार आहे.”

Hollywood Actress Halle Berry Engagement
Mahashivratri 2026 : महाशिवरात्री पासून ‘या’ तीन राशींचे फुलणार भाग्य; १५ फेब्रुवारीनंतर होणार मोठे बदल

हे ऐकून शोमध्ये उपस्थित असलेले हॅली बेरीचे चाहते आनंदीत झाले. सोशल मीडियावरही या बातमीवर चाहत्यांनी प्रतिक्रिया देत हॅली बेरीचे अभिनंदन केले.

हॅली बेरीचे आधीचे तीन विवाह आणि घटस्फोट

वॅन हंटसोबत लग्न झाल्यास हा हॅली बेरीचा चौथा विवाह असेल. याआधी तिने बेसबॉल खेळाडू डेव्हिड जस्टिस, सिंगर-सॉंगरायटर एरिक बेनेट आणि फ्रेंच अभिनेता ओलिव्हियर मार्टिनेज यांच्याशी लग्न केले आहे.

  • हॅलीने डेव्हिड जस्टिससोबत १९९३ मध्ये लग्न केले आणि १९९७ मध्ये घटस्फोट घेतला.

  • त्यानंतर २००१ मध्ये एरिक बेनेटसोबत दुसरे लग्न केले, मात्र २००५ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

  • तिसरे लग्न हॅली बेरीने २०१३ मध्ये ओलिव्हियर मार्टिनेजसोबत केले, पण २०१६ मध्ये त्यांचाही घटस्फोट झाला. आता हॅली बेरी आणि वॅन हंट त्यांच्या नव्या नात्यामुळे चर्चेत आहेत.

या चित्रपटांसाठी हॅली बेरी प्रसिद्ध

हॅली बेरीने ‘मॉन्स्टर्स बॉल’ (२००१) या चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार जिंकला होता. तसेच ‘एक्स-मेन’ फ्रँचायझीमध्ये तिने साकारलेली ‘स्टॉर्म’ ही भूमिका प्रेक्षकांना विशेष आवडली.

याशिवाय ती ‘डाय अनदर डे’ (२००२) आणि ‘द कॉल’ (२०१३) या चित्रपटांमध्येही झळकली आहे. या सर्व चित्रपटांमध्ये तिने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news