
या दिवाळीत थामा आणि एक दिवाने की दिवानीयत हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. पण पुढील महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्ये अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यामुळे सिनेरसिकांना पुढील महिन्यात चांगल्या सिनेमाची मेजवानी मिळणार आहे. जाणून घेऊया या कोणकोणते सिनेमे तुम्ही पाहणार?
यामी गौतम आणि इम्रान हाश्मी यांची मुख्य भूमिका असलेला हा कोर्टरूम ड्रामा देशातील एका महत्त्वाच्या खटल्यावर आधारित आहे. हा सिनेमा 7 नोव्हेंबरला रिलीज होतो आहे.
अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंग यांचा रोमॅंटिक ड्रामा 'दे दे प्यार दे 2’ प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज झाला आहे. या सिनेमात आर माधवन देखील महत्वाच्या भूमिकेत आहे. हा सिनेमा 14 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. हा सिनेमा 2019 मध्ये रिलीज झालेल्या 'दे दे प्यार दे 2’ चा सिक्वेल आहे.
फरहान अख्तर आणि राशी खन्ना यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा एक युद्धपट आहे. 1962 च्या भारत चीन युद्धावर हा सिनेमा बेतला आहे. हा सिनेमा 21 नोव्हेंबरला रिलीज होतो आहे.
मस्ती फ्रँचाईजीमधील चौथा सिनेमा मस्ती 4 लवकरच रिलीज होतो आहे. हा सिनेमा 21 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे.
हुमा कुरेशीची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा विनोदी जॉनर मधला आहे. याशिवाय या सिनेमात श्रेयस तळपदे आणि सनी सिंग यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा सिनेमा 21 नोव्हेंबरला रिलीज होतो आहे.
या सिनेमात धनुष आणि कृती सनॉन यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा सिनेमा आनंद राय यांचा लव, रिव्हेंज ड्रामा असलेल्या या सिनेमात धनुषचा हटके अवतार दिसतो आहे. हा सिनेमा 28 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.