Javed Akhtar | डीपफेकचा धक्कादायक प्रकार! एआय जनरेटेड व्हिडिओ पाहून भडकले जावेद अख्तर

Javed Akhtar On AI Generated Video |डीपफेकचे शिकार झाले जावेद अख्तर, एआय जनरेटेड व्हिडिओविरोधात व्यक्त केला संताप
Javed Akhtar
Javed Akhtar instagram
Published on
Updated on
Summary

ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांचा एआयद्वारे तयार केलेला बनावट डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडिओ पूर्णपणे खोटा असून त्याचा माझ्याशी काहीही संबंध नाही, असे स्पष्ट करत त्यांनी डीपफेकसारख्या तंत्रज्ञानाच्या गैरवापराविरोधात आवाज उठवला आहे.

एआय जनरेटेड फोटोमुळे जावेद अख्तर चर्चेत आले आहेत. त्या व्हिडिओ विरोधात अख्तर नाराज असून त्यांनी या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. संपूर्ण प्रकरण काय? दिग्गज गीतकार जावेद अख्तर आपल्या स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखले जातात. आता त्यांनी डीपफेकच्या दुरुपयोगावर संताप व्यक्त केला आहे. कारण आहे- जावेद अख्तर यांचा डीपफेक व्हिडिओ. त्यांचा एआय जनरेटेड व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता जावेद अख्तर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोबतच एफआयआर दाखल करणार असल्याचे म्हटले आहे.

Javed Akhtar
Yogita Chavan New TV Serial | जीव माझा गुंतला फेम योगिता चव्हाण पुन्हा नव्या भूमिकेतून, नवी मालिका 'या' दिवसापासून भेटीला

काय म्हणाले जावेद अख्तर?

एक्स अकाऊंटवर जावेद अख्तर म्हणाले - माझ्या डोक्यावर टोपी घातलेला माझा संगणकाने तयार केलेला खोटा फोटो दाखवणारा एक बनावट व्हिडिओ प्रसारित होत आहे, ज्यात असा दावा केला जात आहे की, मी अखेरीस देवाच्या मार्गावर वळलो आहे. हे सर्व मूर्खपणाचे आहे. मी याबद्दल सायबर पोलिसांकडे तक्रार करण्याचा गांभीर्याने विचार करत आहे आणि यामागे जबाबदार असलेल्या व्यक्ती विरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे.

सायबर पोलिसात करणार तक्रार

जावेद अख्तर यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर एका पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली होती आणि यावर नाराजी व्यक्त करत म्हटले की- कॉम्प्युटर द्वारा बनवण्यात आलेल्या खोट्या फोटोमध्ये माझ्या डोक्यावर टोपी दाखवण्यात आली आहे. ... हे खूप फालतू आहे. मी गांभीर्याने त्या विरोधात सायबर पोलिसात तक्रार करणार आहे. या खोट्या वृत्तासाठी जबाबदार व्यक्ती आणि हे फॉरवर्ड करून माझी प्रतिमा आणि विश्वसनीयतेला नुकसान पोहचवणाऱ्यांना कोर्टात खेचण्यावर विचार करत आहे.’ सोबतच जावेद अख्तरने एक लिंक देखील शेअर केली आहे, ज्यामध्ये ते त्याच अंदाजात दिसत आहेत.

Javed Akhtar
पोट धरून हसवायला येतोय ‘Maharashtrachi Hasyajatra’चा नवा सीझन, तारीख जाहीर

गेल्या काही काळात अनेक सेलिब्रिटी डीपफेक व्हिडिओचे शिकार झाले आहेत. यामध्ये कलाकार, राजकारणी आणि सार्वजनिक व्यक्तींचा समावेश आहे. यामध्ये रश्मिका मंदाना, आलिया भट्ट, रणवीर सिंह आणि श्रीलीला सारखी नावे समाविष्ट आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news