पोट धरून हसवायला येतोय ‘Maharashtrachi Hasyajatra’चा नवा सीझन, तारीख जाहीर

Maharashtrachi Hasyajatra- आपल्या हसण्याचं कॉमन रिजन! नव्या वर्षात, नव्या जोमाने सुरु होणार नवा सिझन!
image of Maharashtrachi Hasyajatra tv show poster
Maharashtrachi Hasyajatra new season instagram
Published on
Updated on
Summary

मराठी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणारा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा लोकप्रिय कॉमेडी शो लवकरच नव्या सीझनसह छोट्या पडद्यावर परतत आहे. निर्मात्यांनी या नव्या सीझनची अधिकृत तारीख जाहीर केली असून, पुन्हा एकदा प्रेक्षकांना पोट धरून हसवण्यासाठी कलाकार सज्ज झाले आहेत.

मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय आणि प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेला कॉमेडी शो म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. मागील काही सीझनमध्ये या शोने प्रेक्षकांना अक्षरशः पोट धरून हसवले असून, आता पुन्हा एकदा हशांचा महापूर येणार आहे. कारण ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चा नवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्याची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली आहे.

image of Maharashtrachi Hasyajatra tv show poster
Akshaye Khanna Negative Role | 'धुरंधर'च्या यशानंतर आणखी एक खतरनाक रोल, अक्षयच्या हाती लागला प्रशांत वर्माचा 'हा' चित्रपट

या शोच्या नव्या सीझनची घोषणा होताच सोशल मीडियावर प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. विनोद, स्किट्स, सामाजिक विषयांवरील हलक्याफुलक्या टिप्पणी आणि कलाकारांची जबरदस्त टायमिंग ही या शोची खासियत आहे. त्यामुळेच प्रत्येक सीझनला प्रेक्षक मोठ्या उत्सुकतेने वाट पाहतात.

या सीझनमध्ये प्रेक्षकांसाठी खास काय?

नव्या संकल्पनेवर आधारित नवे स्किट्स, नवीन व्यक्तिरेखा आणि खास नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांच्या मनात घर करणारी मराठमोळी विनोदाची शैली, नवे विषय आणि नवे प्रहसन रंगतदार ठरणार आहे.

image of Maharashtrachi Hasyajatra tv show poster
Saumya Tandon | 'जब वी मेट'...'भाबीजी घर पे है' ते 'धुरंधर'...सौम्या टंडनचा कसा घडला प्रवास?

ओंकार भोजनेचं पुनरागमन

ओंकार भोजनेने नुकताच महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात पुनरागमन केले होते. त्याचे नवीन प्रहसन ५ जानेवारीपासून भेटीला येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नव्या सीझनमध्येही प्रेक्षकांचे लाडके कलाकार पुन्हा एकदा विनोदाच्या मंचावर झळकणार आहेत. याशिवाय काही नवे चेहरेही या सीझनमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. शोच्या फॉरमॅटमध्ये फारसा बदल न करता, नव्या आशयासह आणि ताज्या विनोदांसह हा सीझन सादर केला जाणार आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा शो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच आवडता ठरला आहे. घरबसल्या संपूर्ण कुटुंब एकत्र बसून पाहता येईल असा हा कार्यक्रम असल्यामुळे त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. ५ जानेवारीपासून, सोम-मंगळवारी, रात्री ९ वाजता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ पाहता येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news