

काल म्हणजे 15 ऑगस्टला देशाने आपला 79 वा स्वातंत्र्यदिवस साजरा केला. या दिवसाचे औचित्य साधत अनेक सेलिब्रिटींनी सोशल मिडियावर स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देणाऱ्या पोस्ट केल्या होत्या. यामध्ये देशाविषयी प्रेम व्यक्त करण्यासोबतच शहिदांना आदरांजलीही वाहिली. ज्येष्ठ पटकथाकार, गीतकार जावेद अख्तर यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत स्वातंत्र्यदिनाच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. (Latest News Update)
ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, ‘माझ्या भारतीय बहीण भावांना स्वातंत्र्यदिनाच्या खूप शुभेच्छा. आपल्याला हे लक्षात ठेवले पाहिजे की स्वतंत्रता आपल्याला अगदी सहज मिळालेली नाही. यासाठी अनेक लोकांना तुरुंगवास भोगावा लागला तर अनेकांना फासावर चढावे लागले. या अनमोल गोष्टीला कधीही विसरून चालणार नाही.
यावर एका युजरने तुम्हाला 14 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. या रीप्लायवर जावेद अख्तर चांगलेच भडकले. त्यांनी अगदी खरमरीत शब्दांत या युजरला सुनावले आहे. ते म्हणतात, जेव्हा तुझे पूर्वज इंग्रजांच्या चपला चाटत होते, तेव्हा माझे पूर्वज देशाच्या स्वातंत्र्यासाठी काळ्यापाण्याच्या शिक्षेत मरत होते. लायकीत राहा.’
जावेद अख्तर यांचे पणजोबा फजल-ए-हक-खैराबादी स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभागी होते. ते एक कवि आणि स्वातंत्र्यसेनानी होते. 1857 च्या लढ्याचे समर्थन केल्यामुळे त्यानं अंदमान येथील तुरुंगात ठेवले होते. त्याकाळी अंदमान जेल हे अत्यंत कुख्यात होते. बोलीभाषेत त्याचा उल्लेख काळ्यापाण्याची शिक्षा असा केला जायचा. याठिकाणी गेलेला कैदी जीवंत परत येईलच याची खात्री नसायची. त्यामुळे ही शिक्षा मिळणे म्हणजे जवळपास मृत्युदंड असल्यासारखेच होते.
केवळ पणजोबा फजल-ए-हक-खैराबादीच नाही जावेद यांच्या आजोबांनी आणि वडिलांनी देखील या लढ्याचा वारसा पुढे चालवला होता.