

देओल म्हणाले की तगडे आणि देखणे अभिनेते डोळ्यासमोर उभे राहतात. पण या सगळ्यांच्या गर्दीत वेगळा ठरतो तो अभय देओल. जवळपास एक दशक त्याला यशाने हुलकावणी दिली पण देव डी, जिंदगी ना मिलेगी दोबारा सारख्या सिनेमाने नेहमीपेक्षा वेगळ्या पठडीतील सिनेमांचा नायक म्हणून अभय देओल ओळखला गेला. (Latest Entertainment News)
देओल भावंडांच्या masculine हीरोच्या पठडीतून बाहेर पडून हळुवार, शांत आणि हटके नायक त्याने कायमच साकारला आहे. त्याने निवडलेल्या भूमिका केवळ त्याच्यासाठीच लिहिल्या आहेत की काय असे वाटण्याइतक्या तो समरसून जगाला आहे. सोचा ना था पासून सुरुवात केल्यानंतर त्याने चौकटीबाहेरचे सिनेमे निवडले आहेत.
यमांतर सिनेमात काम करणाऱ्या या अभिनेत्याची एकूण संपत्ती त्याच्या दोन्ही चुलत भावांच्या एकत्रित संपत्तीपेक्षाही जास्त आहे. अभयची एकूण संपत्ती 400 कोटी आहे. म्हणजेच अभय हा मोठा भाऊ सनीपेक्षा जवळपास तिपटीने श्रीमंत आहे. सनीची एकूण संपत्ती 120 कोटी आहे. तर भाऊ बॉबी 70 कोटींचा मालक आहे. अलीकडच्या काही वर्षात सनीच्या गदर 2 ने आनि बॉबीच्या अॅनिमलने या दोघांच्या यशात, स्टारडम आणि संपत्तीमध्ये वाढ केली असली तरी एकूण संपत्तीबाबत ते अजून मागेच आहेत.
काय आहेत अभयच्या संपत्तीचे स्त्रोत?
इम्तीयाज अली च्या सोचा न थामधून डेबयू केलेल्या अभयला यशाने 10 वर्षे हुलकावणी दिली. आपल्या 20 वर्षांच्या करियरमध्ये त्याने 4 वेबसिरिज आणि 23 सिनेमात काम केले आहे. ओय लक्की लक्की ओय, देव डी आणि रांझणा ही तीनच सुपरहिट सिनेमे आहेत. उरलेले 14 सिनेमे टोटल फ्लॉप आहेत. त्याची सिनेमातील संपत्ती 10 कोटी आहे.
याशिवाय अभय फॅटी काउ या रेस्टॉरंट चेनचे सह संस्थापक, मालक आहे. याशिवाय फॉरबिडन फिल्म्स या सिनेकंपनीचा मालकही तो आहे. याशिवाय अभयची मुंबई आणि पंजाबमध्ये स्थावर मालमत्ता बरीच आहे. तसेच मुंबईतील त्याच्या घराची किंमत 27 कोटी होती जी आता वाढून आणखी जास्त झाली असेल. तसेच अभयचे गोव्यात ईको फ्रेंडली ग्लास हाऊसही आहे.
या सगळ्यामध्ये अभय मात्र लाईमलाइट पासून लांब असणेच पसंत करतो. अलीकडेच तो 2023 मध्ये आलेल्या ट्रायल बाय फायरमध्ये दिसला होता. यात त्याच्यासोबत अभिनेत्री रसिका देशपांडेही होती