Jailer In Marathi | 'थलैवा' साऊथ रजनीकांत यांचा ब्लॉकबस्टर 'जेलर' पाहा मराठीमध्ये

जेलर चित्रपट मराठीमद्ये पाहायला तयार राहा
rajinikanth Jailer Movie
रजनीकांत यांचा जेलर चित्रपट मराठीमध्ये पाहता येणार Instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - सन मराठी सुपरस्टार रजनीकांत यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘जेलर’ मराठी भाषेत पाहता येणार आहे. मराठी प्रीमियर रविवार, १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता पाहता येणार आहे. रजनीकांत, जॅकी श्रॉफ, मोहनलाल आणि तमन्ना यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या दमदार अभिनय अनुभवता येणार आहे.

'जेलर' एक अ‍ॅक्शन चित्रपट आहे, ज्यात मुथुवेल पांडियनची भूमिका रजनीकांत साकारत आहे, जो एक निवृत्त तुरुंग अधिकारी आहे. आपल्या हरवलेल्या मुलाचा शोध घेण्यासाठी तो पुन्हा गुन्हेगारी जगात उतरतो. एका धोकादायक सिंडिकेटमध्ये शिरकाव करताना, मुथुवेलच्या न्यायाच्या निर्धाराची आणि त्याच्या अफलातून कौशल्याची एक अद्भुत कहाणी उलगडते. सूड आणि निष्ठेच्या या रोमांचकारी प्रवासात आपल्याला उच्च दर्जाचा अ‍ॅक्शन आणि थ्रिलर अनुभवायला मिळणार आहे.

आता, हा चित्रपट मराठी भाषेत सादर होत आहे, ज्यामुळे मराठी प्रेक्षकांना ही धमाकेदार कथा अधिक जवळून अनुभवता येईल.

rajinikanth Jailer Movie
Bigg Boss 18 | डॉली चायवाला ते समीरा रेड्डीपर्यंत बिग बॉस १८ च्या 'या' स्पर्धकांची नावे समोर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news